Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा (bomb threat message at sassoon hospital) मेसेज पाठवल्याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीयं. ससून रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून रुग्णालयातील सुरक्षा रक्षकच आरोपी निघाल्याचं समोर आलंय.
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती
ससून रुग्णालयात बॉम्बची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अरविंद कृष्णा कोकणी (29) याला येरवडा परिसरातून अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली असता तो ससून रुग्णालयातच सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असल्याचं समोर आलं.
विखे-थोरातांची तशी जुनीच पण नवी इनिंग, कारखान्याचा कारभार घेतला हातात; राजकारणही होणार गोड..
आरोपीने मोबाईल हा ससून रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा चोरला होता. या महिला रुग्णाच्या मोबाईलवरुन त्याने ससून रुग्णालयाच्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर ससूनमध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज केला होता. त्यानंतर आरोपीने मोबाईल स्विच ऑफ केला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोबाईल सुरु करुन ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज करुन पुन्हा बंद केला.
अजितदादांना मोठा धक्का! शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, पत्रात खळबळजनक आरोप
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तपास करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत. शहरातील ससून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरच्या मोबाईल फोनवर एका फोन नंबरवरून अज्ञात इसमाने ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब या आशयाचा मेसेज केल्याने खळबळ उडाली होती. 12 मे रोजी आलेल्या या मेसेजनंतर बंडगार्डन पोलीस, बीडीडीएस यांनी हॉस्पिटल पिंजून काढले. मात्र, काहीही आढळून आले नाही. पण, आरोपीच्या या मेसेजमुळे हॉस्पिटल परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.