अजितदादांना मोठा धक्का! शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, पत्रात खळबळजनक आरोप

Pune NCP City President Deepak Mankar Resigns : अखेर पुणे शहर राष्ट्रवादीतील धुसफूस अखेर चव्हाट्यावर आलीय. बदनामी झाल्याचा आरोप करत शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पदाचा राजीनामा (Deepak Mankar Resigns) दिला. त्यांनी अजित पवारांकडे राजीनामा पाठवला. सोबतच एक पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. समाज कंटकाकडून राजकीय बदनामी केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा मानकरांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सुपूर्द केलाय.
पत्रात नेमकं काय?
दीपक मानकर यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की, माझी काही समाजकंटकाकडून राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी जमिनीचा आर्थिक व्यवहार केला होता. या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता 3 ते 4 दिवसांपूर्वी शासनाची फसवणूक (Pune Politics) केली असल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आला आहे. परंतु अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. सत्यता न पडताळता आगामी महापालिका निवडणूक आणि माझी राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Pune Police : गजा मारणेची मटण पार्टी भोवली! पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी निलंबित
हा आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार माझ्याकडून झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची आणि आपली नाहक बदनामी होत (Pune NCP) आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे. त माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, असं दीपक मानकर यांनी म्हटलंय.
प्रकरण काय?
पुण्यात काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान शंतनू कुकडे याच्या बँक खात्यावरुन कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते. आरोपी शंतनू कुकडेचा जवळचा सीए रौनक जैन याच्या बँक खात्यामधून मानकर पिता-पुत्राच्या बँक खात्यामध्ये पावणेदोन कोटी रुपये आल्याची माहिती आहे. मात्र, हे सर्व आरोप मानकरांनी फेटाळून लावले होते.
काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?
पोलिसांनी दीपक मानकर यांना चौकशीसाठी बोलावलं असताना त्यांनी पोलिसांसमोर काही कागदपत्रं सुद्धा सादर केली होती. पोलिसांनी कागदपत्रांची सत्यता तपासली. त्यानंतर ती कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.