काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?

काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?

Sharad Pawar Will Join NCP Alliance Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) गट अन् शरद पवार (Sharad Pawar) गट एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी अलीकडेच पक्षातील धोरण किंवा (Maharashtra Politics) निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जर आमच्या गटाला अजित पवार यांच्या गटासोबत जायचं असेल, तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे (Supriya Sule) घेतील. शरद पवारांनी असं बोलून सर्व सूत्रं नव्या पिढीच्या हाती सोपवली आहेत.

पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे! गारपीट अन् वादळी पावसासह ‘शक्ती’ चक्रीवादळ… हवामान विभाग काय सांगतो?

राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली असून दुपारी दोन वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये (Maharashtra Politics) ही बैठक होणार आहे. तर या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काही खलबतं होणार का, अशी चर्चा देखील रंगली आहे.’

गुडन्यूज! अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल; महाराष्ट्रात कधी आगमन, वाचा सविस्तर..

अलीकडेच शरद पवारांनी म्हटलं होतं की, सत्तेत राहायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया आणि अजितने बसून घ्यावा. विशेष म्हणजे त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले होते. त्यामुळे ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी आहे का, असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पवार काका-पुतणे जर पुन्हा एकत्र आले तर पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलताना दिसणार आहेत.

याविषयी अजितदादा गटातील एका नेत्याने मात्र वेगळाच दावा केलाय. नुकतीच मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवारांनी आमदारांना मार्गदर्शन केले. सध्या वरिष्ठ पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, अशी माहिती त्यांनी आमदारांना दिली. आगामी निवडणुकांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांसोबत गेले पाहिजे, अशी भूमिका काही आमदारांची आहे. तर पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्यं आली असतील, असे अजित पवारांनी या बैठकीमध्ये सांगितलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube