विखे-थोरातांची तशी जुनीच पण नवी इनिंग, कारखान्याचा कारभार घेतला हातात; राजकारणही होणार गोड..

विखे-थोरातांची तशी जुनीच पण नवी इनिंग, कारखान्याचा कारभार घेतला हातात; राजकारणही होणार गोड..

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव झाला होता. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या दोन्ही माजींवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विखेंच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची सर्वानुमते निवड झाली. तर संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाली. दोघेही पराभूत झालेले उमेदवार मात्र आज आपापल्या कारखान्यांच्या चेअरमनपदी विराजमान झाले आहेत.

दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माजी खासदार सुजय विखे हे पूर्वीही आपापल्या ताब्यातील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राहिलेले आहेत. मधल्या काळात हे दोघेही सत्तेत होते. बाळासाहेब थोरातांनी आपल्या सुरुवातीच्या काळात संगमनेर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले होते. मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. तर सुजय विखे देखील 2019 ची निवडणूक लढवून खासदार झाले होते.

सत्तेत असताना दोघांकडे पदे असल्याने कारखान्याकडे फारसे त्यांचे लक्ष नव्हते. याकाळात इतरांना संधी मिळाली होती, मात्र विखे हे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर थोरात यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. आता नुकत्याच दोघांचे वर्चस्व असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. विखे-थोरात हे आपापल्या कारखान्यांचे चेअरमन झाले.

अजितदादांना मोठा धक्का! शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, पत्रात खळबळजनक आरोप

बालेकिल्ल्यात सहकारातून राजकारणावर वर्चस्व

दरम्यान जिल्ह्यातील नेते मंडळींचे राजकारण साखर कारखानदारीवरच टिकून असते आणि त्या माध्यमातून आपला तालुका वा मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवण्यासाठी साखर कारखानदारीचा मोठा उपयोग होत असतो. याच साखर कारखान्याच्या आधारावर विधानसभा निवडणूक लढवण्याची ताकद सहकारातील राजकारणी ठेवून असतात.

2024 ची निवडणूक पराभव दाखवून गेली

नगर जिल्ह्यातील 2024 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक हो राज्यात चर्चेत ठरली. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून सुजय विखे मैदानात होते तर त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून निलेश लंके मैदानात होते. लंके यांनी बाजी मारत विखे यांचा पराभव केला. लोकसभेतील पराभव हा विखेंसाठी मोठा धक्का मानला गेला. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नवख्या अमोल खताळ यांनी पराभूत केले. थोरातांसाठी तसेच काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला गेला. सुजय विखे यांचा जरी लोकसभेत पराभव झाला मात्र राधाकृष्ण विखे यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. एकंदरीतच 2024 ची निवडणुकीने विखे-थोरात यांना पराभव दाखवून दिला.

काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube