पाकिस्तान विरुद्धच्या हवाई युद्धात भारतच विजेता; जगानेही पाहिलं सामर्थ्य, सैन्य इतिहासकाराचा खुलासा..

India Pakistan War : एविएशन एक्सपर्ट आणि सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत (India Pakistan War) एक मोठा दावा केला आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तान विरुद्ध हवाई युद्धात सरळसरळ भारतच विजेता राहिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने थेट पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली. भारतीय सैन्याचे हवाई हल्ले अतिशय अचूक होते. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाइल्सने हल्ला केला. मात्र यातील एकही ड्रोन आणि आपले लक्ष्य गाठू शकला नाही.
टॉम कूपर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की 7 मेच्या रात्रीपासून 9 मेपर्यंत मी जितक्या बातम्या आणि सोशल मीडियावरील घडामोडी पाहिल्या त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की या युद्धात पाकिस्तानला मार खावा लागला. पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानी सैन्याला बॉर्डरवरुन हटवून भारताकडे ढकलण्यात आले. याचाच अर्थ असा होता की भारतीय वायू सेना पाकिस्तानच्या जवळ जाऊन पाकिस्तानच्या आत मिसाईल डागण्यास सक्षम होती.
पाकिस्तान आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमचा प्रभावीपणे वापर करू शकला नाही का असे विचारले असता कूपर म्हणाले, भारताच्या रणनितीत एक मुलभूत बदल झाला होता. त्यामुळे याबाबतीत राजकारणाने अचानक आपला दृष्टीकोन बदलला. बदललेली रणनिती स्वीकारून त्यानुसार कार्यवाही करण्याची क्षमता सशस्त्र दलांकडे हे विशेष. भारतीय वायूसेनेने आधी पाकिस्तानचे एअर डिफेन्स नष्ट केले. नंतर त्यांना आपल्या हवाई क्षेत्रात येण्यापासून प्रतिबंधित केले. यानंतर पाकिस्तानातील एअरबेस आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. ही पूर्ण एक सिस्टिम आहे ज्याद्वारे भारतीय वायूदलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले.
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती
याआधी कधीच असा पराक्रम झाला नाही
भारतीय सैन्य दलांची ट्रेनिंग खास पद्धतीने होते. त्यांना याच ट्रेनिंगचा वापर करून प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले होते. याच कारणामुळे भारतीय वायूदलाने टारगेटेडे अटॅक केले. याआधी त्यांना पाकिस्तानी एअरबेस आणि लष्करी तळांवरील हल्ले टाळा अशा सूचना दिल्या जात होत्या. कोणत्याही परिस्थितीत एलओसी पार करू नका असेही सांगितले जात होते. सैन्याकडे आधीही सीमापार हल्ले करण्याची क्षमता होती परंतु, या क्षमतेचा वापर कधी केला गेला नव्हता. आता मात्र सैन्याने या क्षमतेचा भरपूर वापर केला.
भारताची काय क्षमता आहे याची माहिती जगाला होती. परंतु, या क्षमतेचं प्रदर्शन याआधी कधी झालं नव्हतं. अचानक 24 तासांच्या आत पाकिस्तानवर किती जोरदार प्रहार केला जाऊ शकतो याची प्रचिती भारताने दिली. भारताच्या सैन्य क्षमतेवर कुणाला काहीच संशय नव्हता. भारताबाहेर याला सुपर पावर म्हटले जात होते. परंतु, त्यावेळी आताच्या सारखे राजकीय निर्णय होत नव्हते असे टॉम कूपर यांनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! पाकिस्तानचा मित्र तु्र्कीला भारताचा दणका; TRT वर्ल्डचे एक्स अकाउंट बंद