Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती

Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती

Boycott Türkiye : भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कीस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर ‘बायकॉट तुर्की’ ( Boycott Türkiye ) ही मोहिम ट्रेंड होत आहे. या मोहिमेचा तुर्कीस्तानला मोठा फटका बसत असल्याची परिस्थिती असून या मोहिमेनंतर तुर्कीस्तानकडून आमच्यावर बहिष्कार टाकू नका, अशी विनंतीच करण्यात आली आहे.

BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी

या मोहिमेतंर्गत Ixigo आणि EaseMyTrip सारख्या अनेक ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनी तुर्कीसाठी फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग थांबवले आहेत. पण प्रकरण इथेच थांबले नाही. भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्थानातून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. परिणामी, तुर्की सफरचंद आता बाजारातून जवळजवळ गायब झाले आहेत. या परिणामाचा अर्थ भारतीयांकडून तुर्कीस्तानवर बहिष्कारच टाकला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जियो जोमात आयडीया-बीएसएनएल कोमात, एअरटेलचीही भरारी; ग्राहकसंख्येचा रिपोर्ट मिळाला

तुर्कीस्तानमधील आंकारा पर्यटन विभागाकडून एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आले असून या निवेदनात म्हटले की, भारत-पाकिस्तानच्या संघर्षाची आम्हाला जाणीव आहे. या संघर्षाचा परिणाम भारतातून तुर्कीस्तानात येणाऱ्या पर्यटकांवर काहीही परिणाम होणार नाही. तुर्कीस्तानमधील हॉटेल्स, दुकानांसह सर्वच पर्यटनस्थळांवर भारतीय पर्यटकांचे स्वागतच आहे. आम्ही नेहमीच पर्यटकांना प्रेमाची वागणूक दिलेलील आहे, यापुढेही देत राहू. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता तुर्कीस्तानच्या कोणत्याही पर्यटनाच्या सहली पुढे ढकलू नये, अथवा रद्द करु नये, असं आवाहन करण्यात आलंय.

BJP Ahilyanagar President :  भाजपच्या नगर शहराध्यक्षपदाचं घोड कुठं आडलं?

तसेच तुर्कीस्तानात येणाऱ्या भारतीय पर्यटकांवर कोणतेही निर्बंध किंवा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होणार नाही. पर्यटकांच्या वास्तव्यादरम्यान आरामदायी, सुरक्षित आणि समाधानी राहण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. जर काही अडचणी असतील तर संकोच न करता आम्हाला संपर्क करण्याचं आवाहन आंकारा पर्यटन विभागाकडून भारतीय पर्यटकांना करण्यात आलंय.

छत्री घेऊनच घराबाहेर पडा! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी

दरम्यान, तुर्कीस्ताने पाकिस्तानला साथ दिल्याने आता भारताकडून तुर्कीमधील सफरचंदावर बहिष्कार घालण्यात आला आहे. तुर्कीमधून सफरचंद आयात न करता इराणमधून सफरचंदांची मागणी वाढली आहे. तुर्की सफरचंदांऐवजी इराणी, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधील सफरचंदांना प्राधान्य देत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करीत प्रत्युत्तर दिलं. तब्बल 86 तास चाललेल्या युद्ध मोहिमेत भारताचं कमी पण पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांकडून युद्धविराम देण्यात आला. त्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच पाकिस्तानसोबत चर्चा करणार असल्याची भूमिका भारताने स्पष्ट केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या