छत्री घेऊनच घराबाहेर पडा! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी

छत्री घेऊनच घराबाहेर पडा! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी

Rain Alert In Madhya Maharashtra Marathwada : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी (Rain Alert) लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आज देखील कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची ( Maharashtra Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.

सोलापूर, कोल्हापूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, धाराशिव (Weather Update) या जिल्ह्यांना वादळी पाऊस गारपिटीचा इशारा दिला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांना वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय.

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात हवामान पुन्हा एकदा बदलणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा उष्णतेची लाट दिसून येणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजचा नवीनतम हवामान अंदाज जारी केला आहे. पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे, तर वायव्य आणि मध्य भारतात वादळ आणि जोरदार वारे उष्णतेपासून काही प्रमाणात आराम देऊ शकतात. ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील हवामानाचा पॅटर्न प्रदेशानुसार बदलू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस आणि जोरदार वारे तर पूर्व उत्तर प्रदेशात तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. लखनौमध्ये कमाल तापमान 41 अंश आणि किमान 29 अंश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.बिहारमध्ये उष्णतेची लाट कायम राहील.

अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः उत्तरेकडील भागात, उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहील. दक्षिणेकडील भागात हलका पाऊस आणि जोरदार वाऱ्यासोबत हवामान खात्याने उष्णता आणि आर्द्रतेमुळे अस्वस्थतेचा इशारा दिला आहे.राजस्थानमधील हवामान कोरडे आणि उष्ण राहील. काही भागात हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube