अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही, सडेतोड उत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi : भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देणार, अणु हल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. असा इशारा ऑपरेशन सिंदूरनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी स्पष्ट मेसेज देत पाकिस्तानचा (Pakistan) बुरखा फाडला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत अणु हल्ल्याची धमकी सहन करणार नाही. आता भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास आम्ही सडेतोड उत्तर देणार असं मोदी म्हणाले. तसेच आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या आकांना वेगळं समजणार नाही. सध्याचं युग युद्धाचं नाही पण दहशतवादाचंही नाही. टेरर आणि टॉक सोबत चालू शकत नाहीत आणि पाकिस्तानशी चर्चा फक्त पीओकेवर होणार असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

तसेच आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या आकांना वेगळं समजणार नाही. सरकार पुरस्कृत दहशतवादाचं पाकिस्तान मोठं उदाहरण आहे. आम्ही युद्धाच्या मैदानात पाकिस्तानला कायम धूळ चारली आहे. सरकार पुरस्कृत दहशतवादाचं पाकिस्तान मोठं उदाहरण आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानची घोर निराशा झाली आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

तर तीन दिवसात भारतानं पाकला नेस्तनाबूत केले त्यामुळे पाकिस्तान बचावात्मक भूमिकेत आला. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने धार्मिक स्थळं, शाळांना लक्ष्य केल. मात्र भारताने पाकिस्तानचे ड्रोन भारतानं हवेतच नष्ट केलं. आम्ही पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. यापुढे दहशतवादी हल्ले करणार नसल्याचं पाकनं सांगितलं आहे. असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला

आम्ही पाकविरोधातील कारवाई फक्त स्थगित केलीय. येणाऱ्या काळात पाकच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर राहणार असा इशारा देखील पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती देखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube