आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा बुरखा फाडला

PM Modi Address To Nation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पहिल्यांदा देशाला संबोधित करत पाकिस्तानला इशारा दिला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकांणावर हवाई हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी धर्म विचारुन आतंकवाद्यांनी 26 जणांचा जीव घेतला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशाकडून कारवाई मागणी होत होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतीय लष्कराला स्वातंत्र्य दिला होता. आम्ही आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. असेही मोदी म्हणाले. या कारवाईत भारतानं 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती देखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने धार्मिक स्थळं, शाळांना लक्ष्य केलं. मात्र भारताने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले तसेच तीन दिवसात भारतानं पाकला नेस्तनाबूत केलं आणि भारताच्या हल्ल्यामुळे पाक बचावात्मक भूमिकेत आला असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
पाकिस्तानला मदत अन् भारताला विरोध, तुर्कीचे ‘आशिया वन’ धोरण भारतासाठी धोका का?
पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. यापुढे दहशतवादी हल्ले करणार नसल्याचं पाकनं सांगितलं आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तर आम्ही पाकविरोधातील कारवाई फक्त स्थगित केलीय. येणाऱ्या काळात पाकच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर राहणार असा इशारा देखील पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिला.