Download App

कोल्हे अन् जानकारांनी अजितदादांची नाक घासून माफी मागावी; अमोल मिटकरींची अट

अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.

Amol Mitkari : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार (Sharad pawar) एका कार्यक्रमात एकाच मंचावरही दिसले. त्यामुळे आता युतीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. अशातच अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी युतीबाबत मोठं विधान केलंय. अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.

पाकिस्तान विरुद्धच्या हवाई युद्धात भारतच विजेता; जगानेही पाहिलं सामर्थ्य, सैन्य इतिहासकाराचा खुलासा..

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादांवर ज्यांनी निवडणुकीत विखारी टीका केली, त्यांनी नाक घासून दादांची माफी मागावी, त्यानंतरच दादांनी एकत्रिकरणाबाबत चर्चा करावी, टोकाची भाषणं करणाऱ्यांमध्ये पहिला नंबर उत्तमराव जानकर तर दुसरा नंबर अमोल कोल्हेंचा आहे, यांना लाज, लज्जा, शरम वाटत असेल तर माफी मागून पापक्षालन करावं, असं अमोल मिटकरींनी स्पष्ट केलंय.

विखे-थोरातांची तशी जुनीच पण नवी इनिंग, कारखान्याचा कारभार घेतला हातात; राजकारणही होणार गोड..

तसेच दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार सांगतील तेच धोरण, आणि ते बांधतील तेच तोरण असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या युतीबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलंय.

अजितदादांना मोठा धक्का! शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा तडकाफडकी राजीनामा, पत्रात खळबळजनक आरोप

आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं, अजित पवारांसोबत जावं, तर दुसऱ्या गटाला वाटतं की, अजितदादांसोबत जाऊ नये, एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अन् अजित पवार यांनी बसून ठरवावं, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचंही पाहायला मिळालं होतं. काही वेळाला त्यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या. या भेटी एकप्रकारे राजकीय जवळीक वाढवण्याचे संकेत देतात. त्यामुळं राजकीय मतभेद बाजूला ठेवून शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय जाणकार सांगतात.

follow us