अजित पवार बीडमध्ये दाखल होताच अधिकाऱ्यांवर संतापले; म्हणाले तुम्हाला फक्त चार तास देतो…

Ajit Pawar Beed Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर असून सकाळी पोलीस अधीक्षकांसमोरच अधिकाऱ्यांवर संतापले. (Beed) मी तुम्हाला चार तास देतो सगळी माहिती तयार ठेवा असं म्हणत, अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
अपटू डेट माहिती हवी
दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीआधी सगळी माहिती तयार ठेवा अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत. मिटींग सुरू झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही असं चालणार नाही. सगळी अपटू डेट माहिती हवी असं स्पष्ट शब्दात अजितदादांनी सांगितलं. अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते. प्रकृती ठीक नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये येताच धनंजय मुंडे गेले मुंबईला; वाचा, काय आहे नक्की कारण?
धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती.
शिक्षकांची घोषणाबाजी
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनेकडून घोषणाबाजी करण्यात आली. आत्महत्या केलेल्या नागरगोजे नामक शिक्षकाच्या घटने संदर्भात घोषणाबाजी करत न्याय देण्याची मागणी करण्यात आली.