Download App

सिंधू करार स्थगित होताच पाकिस्तानच्या मदतीला चीन; पाणी अन् विजेसाठी चीनचा प्रोजेक्ट सुरू..

चीन पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये बांधकाम सुरू असलेल्या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्लॅनिंग करत आहे.

China Dam in Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवण्याआधी म्हणजेच सर्वात आधी भारत सरकारने सिंधू पाणीवाटप करार स्थगित (Indus Water Treaty) केला आहे. या निर्णयाने पाकिस्तानात हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानमध्ये आतापासूनच पाण्याचे टेन्शन निर्माण झाले आहे. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर या कराराबाबत चर्चा करण्याची विनंती पाकिस्तानने (India Pakistan Ceasefire) केली होती. परंतु भारताने हा करार आता स्थगितच राहील असे स्पष्ट केले.

भारत आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही याचा अंदाज आल्याने पाकिस्तान सरकारने (Pakistan News) पाण्यासाठी अन्य मार्गांचा शोध सुरू केला आहे. यासाठी पुन्हा चीनची मदत घेण्याचे नक्की केले आहे. चीन पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये बांधकाम सुरू असलेल्या धरणाचे काम (China Dam in Pakistan) लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्लॅनिंग करत आहे.

भारत पाकिस्तानच्या वादात बांग्लादेशची चांदी; एलन मस्कच्या कंपनीशी मोठी डील, काय घडलं?

स्थानिक मीडियातील वृत्तानुसार सिंधू पाणीवाटप करार स्थगित झाल्याच्या काही आठवड्यानंतर चीनने या धरणाच्या कामात तेजी आणण्याची घोषणा केली होती. चायना एनर्जी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन सन 2019 पासून खैबर पख्तुनख्वामध्ये एका हायड्रोपॉवर प्रोजेक्टवर काम करत आहे. सन 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परंतु आता आणखी वेगात काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

शनिवारी चीनच्या एका सरकारी एजन्सीने सांगितले की धरणावर काँक्रिट करण्याचे काम सुरू झाले आहे. धरणाचे काम अधिकृतपणे सप्टेंबर 2019 मध्ये सुरू झाले होते. या धरणाच्या माध्यमातून खैबर पख्तुनख्वामध्ये वीज उत्पादन, पूर नियंत्रण, सिंचन आणि पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या विविध कामांसाठी धरणाचे डिझाइन केले आहे. या माध्यमातून 800 मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तसेच खैबर पख्तुनख्वाची राजधानी पेशावर शहराला दर दिवशी 300 मिलियन गॅलन पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात येणार आहे.

पाकिस्तान, तुर्कीनंतर आता चीन; भारताने चायनाला दिला मोठा दणका, वाचा, नक्की काय घडलं?

follow us