DeepSeek AI : चीनने एआय जगतात सध्या धुमाकूळ घातला आहे. चीनने DeepSeek AI मॉडेल जगासमोर सादर केले. चीनच्या स्टार्टअप कंपनीने अतिशय कमी किंमतीत एआय मॉडेल तयार केल्याची समजताच शेअर बाजारात हाहाकार उडाला. अमेरिकी टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. याच बरोबरच जगातील अनेक अब्जाधीशांची संपत्तीही झटक्यात कमी झाली.
डीपसीक या एआय स्टार्टअपची स्थापना हेज फंड आणि एआय इंट्रस्ट्रीजमधील प्रमुख लिआंग वेनफेंग यांनी स्थापन केलीय. वर्षापूर्वीच हे स्टॉर्टअप स्थापन झालेले आहे. या DeepSeek AI च्या टीममध्ये मुख्यत्वे चिनी विद्यापीठातील तरुण, हुशार पदवीधरांचा समावेश होता. गेल्याच आठवड्यात डीपसीक हे AI मॉडेल लाँच केले गेले. डीपसीकची एआय सेवा सुरू झाल्यानंतर chatgpt पेक्षा जास्त त्याचे डाउनलोड झाले आहेत.
विशेष म्हणजे अमेरिकेतील मोठी स्वॉफ्टवेअर कंपनी निविडाच्या (Nvidia) चिप्सशिवाय हे एआय तयार झाले. ते पण फक्त 15-20 दशलक्ष डॉलर्स खर्चात. Google, meta, Microsoft ने लाँच केलेल्या AI संशोधनासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च झालाय. या एआयमध्ये हाय लेवल हार्डवेयर वापरले गेलेले नाहीत. तसेच ओपन सोर्स टेक्नोलॉजीचा वापर केलाय. कमी खर्चात तयार झालेल्या या एआयमुळे अमेरिकेतील कंपन्या आणि त्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
चिनी DeepSeek AI गेमचेंजर ठरणार ? अमेरिकेची मक्तेदारी असलेल्या टेक कंपन्या धोक्यात
कमी खर्चातील डीपसीक एआय लॉँच झाल्यानंतर लगेच त्याचा फटका अमेरिकेतील एआय कंपन्यांच्या शेअर्सला बसलाय. अमेरिकेचा Nasdaq फ्युचर्स पाच टक्के खाली उघडला आहे. प्रसिद्ध स्वॉफ्टवेअर कंपनी एनविडिया (Nvidia) स्टॉक 12 टक्के घसरला आहे. तर एमआयडीचा शेअर चार टक्के, मायक्रोस्वॉफ्ट सहा टक्के आणि मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर तीन टक्के घसरले आहेत. त्याचबरोबर जपानमधील टेक कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत.
चीनच्या या झटक्याचा मोठा परिणाम झाला आहे. जगातील जवळपास 500 अब्जाधीशांची संपत्तीत एकूण 9.34 लाख कोट रुपयांची घसरण झाली आहे. सर्वाधिक नुकसान ओरेकल कॉर्पचे सह संस्थापक लॅरी एलिसन आणि एनविडियाचे सह संस्थापक जेनसेन हुआंग यांना सहन करावे लागले आहे.
चीनच्या या पावलाने ज्यांचे भवितव्य एआयशी जोडले गेले आहे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. एआयसाठी आवश्यक असणारी चीप तयार करणारी कंपनी एनवीडियाचे सहसंस्थापक जेनसेन हुआंग यांच्यासाठी सोमवारचा दिवस मोठ्या भुकंपाचा ठरला. एआय मॉडेल अतिशय स्वस्त होणं हे यामागचं कारण आहे. यामुळे त्यांची संपत्त तब्बल 20.1 बिलियन डॉलर्सने कमी झाली.
ओरकल कॉर्पचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांचीही अशीच स्थिती होती. त्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 22.6 अब्ज डॉलर्सची घट झाली. आता त्यांच्याकडे 186 बिलियन डॉलर इतकी संपत्ती राहिली आहे.
कोरोना व्हायरस चिनी प्रयोगशाळेतूनच लीक, CIA ने केला मोठा दावा
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार चीनच्या या निर्णयाचा परिणाम डेल इंकचे मायकल डेल यांच्यावरही दिसून आला. त्यांची नेटवर्थ 13 अब्ज डॉलर्सने घटली. बायनान्स होल्डिंग्सचे सहसंस्थापक चानपेंग झाओ यांना 12.1 अब्ज डॉलर्स तर एलन मस्कला 6.7 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. गगुलचे लॅरी पेज आणि सरगेई ब्रिन यांच्या संपत्तीत क्रमशः 6.3 अब्ज डॉलर्स आणि 5.9 अब्ज डॉलर्स इतकी घट झाली.
अशा प्रकारे चीनच्या डीपसीक एआयने जगातील 500 अब्जाधीशांच्या संपत्तीत एकूण 108 अब्ज डॉलर्सची घट आणली. यात टेक क्षेत्रातील अब्जाधीशांची 94 अब्ज डॉलर्सची संपत्ती साफ झाली. अमेरिकेचा नॅस्डॅक कंपोझिट इंडेक्स सोमवारी 3.1 टक्क्यांनी तर एसअँडपी 500 इंडेक्स 1.5 टक्क्यांनी घसरला.
डीपसीक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या एआय मॉडेलला तयार करण्यासाठी फक्त दोन महिने लागले. OpenAI, Microsoft, Google या दिग्गज कंपन्यांना त्यांचे एआय मॉडेल तयार करण्यासाठी वर्षे लागली. तसेच या कंपन्यांनी यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केले. परंतु, Deepseek AI मॉडेल तयार करण्यासाठी चीनच्या स्टार्टअपने फक्त 60 लाख डॉलर (6 मिलियन डॉलर) खर्च केले आहेत. अत्यंत कमी खर्चात एआय मॉडेल तयार केल्याचा दावा कंपनीने केला आहे.