Download App

China Earthquake : चीनमध्ये शक्तिशाली भूकंप! 111 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती उद्धवस्त

China Earthquake : आशिया खंडातील देशात भूकंपाच्या घटना सातत्याने भारतासह बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तान या देशांत शक्तिशाली भूकंप झाले. त्यानंतर आता चीनही भूकंपाने (China Earthquake) हादरला आहे. चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री जोरदार भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी मोजण्यात आली. चायना अर्थक्वेक सेंटरने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उत्तर पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात हा भूकंप झाला. या भुकंपात 111 लोक मृत्यूमुखी पडले तर दोनशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की क्षणात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले.

Earthquake : पाकिस्तानसह दोन देशांत भूकंप; घरांची पडझड, लोकांची पळापळ

या भुकंपाची तीव्रता खूप जास्त होती. धक्के जाणवू लागल्यानंतर लोक प्रचंड घाबरले. पळापळ सुरू झाली. तरी देखील काही कळण्याच्या आत घरे कोसळू लागली. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्ट्सनुसार गान्सू आणि किंघाई प्रांताात 6.2 तीव्रतेच्या भुकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखीही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मयतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली.

या भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झालं आहे. या भागात अनेक इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. भुकंपाचा केंद्रबिंदू 35.7 अंश उत्तर अक्षांश आणि 102.79 अंश पूर्व रेखांशावर दहा किलोमीटर खोल होता. दहा किलोमीटर खोल असतानाही त्याच्या धक्क्याने अनेक इमारती कोसळल्या. याचाच अर्थ हा भूकंप प्रचंड शक्तिशाली होता असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के 

याआधी सोमवारी पाकिस्तानातही भूकंप झाला होता. मात्र या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटरने दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप 133 किलोमीटर खोलीवर झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू भारतातील जम्मू आणि काश्मिरात होता. पाकिस्तानच्या अनेक शहरांत या भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर चीनमध्ये झालेल्या भूकंपात मात्र मोठी जीवितहानी झाली. घरांचेही मोठे नुकसान झाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज