Download App

काय सांगता! चीनने चक्क लढाऊ विमानांचे टेक्निकच चोरले, ‘या’ देशांच्या फायटर जेटचे बनवले डुप्लीकेट

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

When China US and Russia Fighters Jet : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालाने जगाचे लक्ष पुन्हा चीनकडे वेधले आहे. हत्यारे आणि फायटर जेटच्या बाबतीत आत्मनिर्भर होत आहे. मागील चार वर्षांच्या काळात चीनने हत्यारे आणि त्याच्याशी संबंधित अन्य वस्तूंची आयात 64 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. चीन आता जगातील टॉप 10 आयातक देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

आता चीनने हा कारनामा केला तरी कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण कोणतेही तंत्रज्ञान अस्तित्वात येणे एक दिवसाचे काम नाही. शोधासाठी अनेक वर्षे खर्ची घालावी लागतात. यानंतर एखादी नवीन माहिती कळते. अशी स्थिती असताना हत्यारांची खरेदी एकदम कमी होणे ही घटना पचनी पडत नाही. तसं पाहिलं तर भारतानेही मागील चार वर्षांच्या काळात आयातीत 11 टक्के घट केली आहे. यावरुन दिसून येते की भारताला आत्मनिर्भर होण्यास आणखी बराच काळ परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

सध्याच्या काळात भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवर वाद होतच असतो. भारतही शस्त्रास्त्रे आणि अन्य उत्पादनांच्या बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून चीनकडून आयात बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे. हत्यारांचे डिझाईनपासून त्यांच्या निर्मितीपर्यंत प्रत्येक गोष्ट देशातच तयार होत आहे. पण संपूर्ण जगालाच माहिती आहे की अशा गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा कोणत्याही तंत्रज्ञानाची कॉपी केली जाते. अन्यथा काही वर्षे या गोष्टी शक्य होत नाहीत. चीनी लोक तर कॉपी करण्यात माहीर आहेत. चीनकडून आमच्या तंत्रज्ञानाची नक्कल केली जात असल्याचा आरोप अमेरिकेने याआधी अनेक वेळा केला आहे. चला तर मग माहिती घेऊ की चीनने दुसऱ्या देशांकडून नेमकं काय काय कॉपी केलं?

ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, ‘या’ देशांतील 5 लाख लोक होणार हद्दपार; भारतीयांचं काय?

एफ 7 फायटर जेट

सोव्हिएत संघ आणि चीन यांचे संबंध फार जुने आहेत. मागील काही दशकांपासून चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे खरेदी करत होता. परंतु, अलीकडच्या काही वर्षांत यात मोठी घट झाली आहे. सन 1962 मध्ये सोव्हिएत रशियाने चीनला 21 फायटर जेट देण्याची ऑफर दिली होती. यानंतर मिग 21 चीनकडून खरेदी करण्यात आले. याचबरोबर चीनने यातील तंत्रज्ञानाची कॉपी करणे सुरू केले. यानंतर एफ 7 नावाने स्वतःचे फायटर जेट जगासमोर आणले. रक्षा विशेषज्ञाचे म्हणणे आहे की कॉपी करुन चीनने पैसे आणि वेळ यात बचत केली.

जे 10 लढाऊ विमान

चीन आधीपासूनच असे उद्योग करत आला आहे. 1980 च्या दशकातील गोष्ट आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात एफ 16 नावाने नवीन फायटर जेट तयार करण्यावर सहमती झाली होती. पण नंतर अमेरिका यातून बाजूला झाला. तोपर्यंत इस्त्रायलने बरेच काम पूर्ण केले होते. नंतर इस्त्रायलने हा प्रोजेक्ट जसाच्या तसा चीनला विकून टाकला. यामुळे चीनचे काम सोपे झाले. एफ 16 टेक्नॉलॉजी मिळाल्यानंतर चीनने जे 10 नावाने नवीन विमान 2007 मध्ये सादर केले.

जे 11 फायटर प्लेन

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर चीनने हे विमान 1998 मध्ये तयार केले होते. रशियाच्या सुखोई एसयू 27 एसके या विमानाची कॉपी करून चीनने हे विमान तयार केल्याचे सांगितले गेले. यासाठी चीनने रशिया बरोबर एका महागडा करार केला होता. यामध्ये असे ठरले होते की चीन रशियाकडून सामान घेऊन दोनशे विमाने तयार करील. चीनने आपले टार्गेट पूर्ण केले पण याबरोबरच जे 11 हे नवीन लढाऊ विमान देखील आणले.

जे 15 विमान

सन 2001 मधील गोष्ट आहे. चीनने युक्रेनबरोबर एसयू 33 चे एक अपूर्ण प्रोटोटाइप टी 10 के 3 नावाने खरेदी केला. यातही चीनने त्याची चालाखी दाखवलीच. रिव्हर्स इंजिनियरींग करून जे 15 फायटर जेट तयार केले. जगभरात हे विमान फ्लाइंग शार्क या नावानेही ओळखले जाते. चीनचे नेवल विंग या विमानाचा वापर करते. चौथ्या पिढीतील हे विमान अत्यंत शक्तिशाली असल्याचे सांगितले जाते.

काय सांगता! नेपाळ अन् पाकिस्तान भारतापेक्षाही हॅपी; नव्या अहवालात धक्कादायक खुलासा..

जेएफ 17 विमान

रशियन मिग 21 आणि इस्त्रायली एफ 16 या विमानांचे तंत्रज्ञान एकत्रित करुन एक नवीन फायटर जेट जेएफ 17 या नावाने चीनने विकसित केले.

जे 20

चीनने आणखी एक शक्तिशाली लढाऊ विमान तयार केले. 2016 मधील चीनी एअर शोमध्ये या विमानाला लाँच करण्यात आले होते. प्रयोग म्हणून 2011 मध्येच या विमानाचे पहिले उड्डाण झाले होते. हे विमान अमेरिकी एफ 22 आणि एफ 35 विमानांचे मिश्रित रुप आहे असा आरोप झाला होता. मिडिया रिपोर्ट्सनुसार या विमानांची टेक्नॉलॉजी चीनी नागरिक सु बिनने अमेरिकेतून चोरली होती. अमेरिकी सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार हा व्यक्ती चीनी सैन्यासाठी काम करत होता. या व्यक्तीची चोरी पकडल्यानंतर त्याला शिक्षा झाली होती परंतु, बिनने त्याचे काम चोख बजावले होते.

शेनयांग एफसी 31

या नावाने चीनने पाचव्या पिढीतील एक फायटर जेट तयार केले. विमान सध्या निर्माण आणि परीक्षणाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे हे विमान लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. हे विमान देखील अमेरिकी फायटर प्लेन एफ 35 ची कॉपी करून तयार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. आता चीन जर विमानांचे टेक्निक चोरत असेल तर लहान हत्यारांच्या बाबतीतही त्याने असा उद्योग केला असेलच. विशेष म्हणजे चीनचे हे सगळे कारनामे इंटरनेटवरही आहेत. परंतु, चीनी राज्यकर्त्यांना याचा काहीच फरक पडत नाही.

follow us