ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, ‘या’ देशांतील 5 लाख लोक होणार हद्दपार; भारतीयांचं काय?

ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, ‘या’ देशांतील 5 लाख लोक होणार हद्दपार; भारतीयांचं काय?

US President Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आणखी एक खळबळजनक निर्णय घेतला आहे. क्यूबा, हैती, निकारागुआ आणि व्हेनेजुएला या देशांतील तब्बल 5 लाख 30 हजार स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण रद्द केले आहे. या निर्णयानंतर या स्थलांतरीत लोकांना एका महिन्याच्या आता अमेरिका सोडावा लागणार आहे. होमलँड सुरक्षा विभागाने घोषणा केली आहे की या देशांचे अप्रवासी ऑक्टोबर 2022 मध्ये फायनान्शिअल स्पॉन्सरसहीत अमेरिकेत आले होते. त्यांचे पॅरोल स्टेटस आता समाप्त करण्यात येईल.

या स्थलांतरीत लोकांना अमेरिकेत राहणे आणि काम करण्यासाठी दोन वर्षांचे परमिट देण्यात आले होते. या परवानगीची मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता या लोकांना कोणतीही कारणे न देता निमूटपणे अमेरिकेतून बाहेर पडावे लागणार आहे. अमेरिका सरकारकडून सध्या अवैध प्रवाशांविरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचाच एक भाग म्हणून या लोकांना एक महिन्याच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प देणार 60 हजार कर्मचाऱ्यांना नारळ, प्लॅन रेडी; संरक्षण विभागात खळबळ!

मानवीय पेरोल सिस्टीम एक कायदेशीर व्यवस्था आहे. या माध्यमातून युद्ध किंवा राजकीय अस्थिरतेचा सामना करत असलेल्या देशांतील लोकांना अमेरिकेत तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश दिला जातो. ठराविक कालावधीसाठी देशात राहण्याची आणि काम करण्याची अनुमती दिली जाते. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात क्यूबा, हैती, निकारागुआ आणि वेनेजुएला या देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.

या सिस्टीमचा प्रचंड दुरुपयोग झाला असा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. त्यामुळे ही सिस्टीमचा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याअंतर्गत आता स्थलांतरीत लोकांना 24 एप्रिलनंतर अमेरिका सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्थलांतरीत लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिका सरकारने सर्व प्रक्रिया पूर्ण करून देश सोडून जाण्यासाठी या लोकांना एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीतही जर या लोकांनी देश सोडला नाही तर मात्र त्यांना हाकलून लावले जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत शिक्षण विभागाला टाळे? आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांची सही; कारणही धक्कादायक..

जो बायडन सरकारने 2022 मध्ये वेनेजुएलातील स्थलांतरीतांसाठी पेरोल एन्ट्री प्रोग्राम सुरू केला होता. यानंतर 2023 मध्ये यात आणखी विस्तार करुन क्यूबा, हैती आणि निकारागुआ या देशांतील स्थलांतरीतांनाही अमेरिकेत आश्रय देण्यात आला. या लोकांना दोन वर्षांची पेरोल देण्यात आली होती. परंतु, आता या पेरोलची मुदत संपली आहे. त्यामुळे या लोकांना बिनबोभाट अमेरिकेच्या बाहेर पडावे लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube