Download App

‘लेबनॉन अन् गाझातील हल्ले तत्काळ थांबवा’; चीनने इस्त्रायलला घेरलं

गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.

Israel Lebanon Conflict : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला (Israel Attack) संघटनेचा प्रमुख हसन नरसल्लाह (Israel Lebanon Conflict) काल मारला गेला. इस्त्रायल डिफेन्स फोर्सने (IDF) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली होती. हमासनंतर हिजबुल्लाचा खात्मा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे. इस्त्रायली सैन्य दलाचे प्रवक्त्यांनी हिजबुल्ला प्रमुख मारला गेल्याची माहिती दिली होती. या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आमचा बदला पूर्ण झाला आहे अशी प्रतिक्रिया इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिली होती. त्यानंतर आता या सर्व घडामोडीत चीनचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी : इस्त्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार; इस्त्रायली सैन्यानं केलं कन्फर्म!

नसरल्लाहच्या 32 वर्षांच्या कार्यकाळात त्याने अनेक निष्पाप इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांची हत्या आणि अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तो जबाबदार होता. जगभरात दहशतवादी करण्यातही त्याचा हात होता. या दहशतवादी हल्ल्यांत अनेक देशांतील निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. हिजबुल्ला संघटनेत नसरल्लाह सर्व महत्वाचे निर्णय घेत होता आणि रणनीतीही ठरवत होता अशी माहिती इस्त्रायली सैन्याचे प्रवक्ते डॅनियल यांनी सांगितले होते.

चीन सरकारच्या विदेश मंत्रालयाच्या वेबसाइटवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की चीनने सांगितले की लेबनॉनच्या संप्रभूतेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो. या भागात युद्धाचा वणवा पसरू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गाझा आणि लेबनॉनमध्ये आता जे हल्ले सुरू आहेत ते तत्काळ थांबले पाहिजेत. रशियानेही हिजबुल्ला प्रमुखाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. बळपूर्वक करण्यात आलेल्या या कारवाईचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतील.

मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलने अत्याधुनिक अमेरिकी विमान एफ 35 च्या मदतीने हिजबुल्लााच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. 80 टन वजनाचे बॉम्ब टाकण्यात आले. यामुळे जमिनीच्या 20 मीटर आत तयार करण्यात आलेल्या बंकरमध्ये बसलेला हिजबुल्लाचा म्होरक्या आणि अन्य काही लोकांचा मृत्यू झाला.

तिसऱ्या महायुद्धाचा धोका! लेबनॉनवर इस्त्रायल करणार मोठा हल्ला? आदेश नेमका काय..

दरम्यान, हिजबुल्लाने पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमास बरोबर 8 ऑक्टोबर 2023 पासून इस्त्रायल विरुद्ध युद्ध पुकारले होते. युद्धाच्या सुरुवातीपासूनच इस्त्रायली नागरिकांना टार्गेट केले जात होते. यामुळे लेबनॉन आणि या पूर्ण प्रदेशात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. आयडीएफ चीफ लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी यांनी सांगितले की ही घटना टूलबॉक्समधील टूलचा शेवट नक्कीच नाही. आमचा संदेश एकदम स्पष्ट आहे की जो कुणी इस्त्रायलच्या नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करेल त्यांना कुठे पाठवायचं हे आम्हाला माहिती आहे.

follow us