तिसऱ्या महायुद्धाचा धोका! लेबनॉनवर इस्त्रायल करणार मोठा हल्ला? आदेश नेमका काय..
Israel Lebanon Tension : इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील वाढत्या तणवाने (Israel Lebanon Tension) संपूर्ण पश्चिम आशियाच संकटात (West Asia) सापडला आहे. इस्त्रायली सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हेराजी हालेवी यांनी लेबनानवर जमिनी हल्ला करण्यास तयार राहा असे आदेश सैनिकांना दिले आहेत. इस्त्रायलने आधी अशा प्रकारच्या हल्ल्याची (Israel Attack) योजना तयार केली नव्हती. मात्र हिजबुल्लाने दिलेल्या धमकीनंतर या शक्यतेवर गंभीर विचार केला जात आहे. याआधी इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात साडेपाचशे लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. लेबनॉनमधील बेका परिसरात रात्रभर हल्ले करण्यात येत होते.
या व्यतिरिक्त लेबनॉनमधील कफर तिब्नीत, कफर रेमन आणि नबातियेह या भागांना हवाई हल्ल्यात टार्गेट करण्यात आले. हिजबुल्लावर दबाव आणण्यासाठी इस्त्रायलकडून शहरे आणि गावांतील जास्तीत जास्त लोकांना विस्थापित केले जात आहे. या रणनितीवर इस्त्रायल वेगाने काम करत आहे. यामुळे दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला असून केव्हाही युद्ध भडकेल (War) अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्राचं मोठं पाऊल; Israel-Hamas War मध्ये बालहक्कांचं उल्लंघन झाल्याचा रिपोर्ट
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी दोन्ही देशांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे. जर युद्ध सुरू झाले तर संपूर्ण पश्चिम आशियात विनाश घडू शकतो असा इशारा ब्लिंकेन यांनी दिला. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. या दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही दोन्ही देशांतील युद्ध या प्रदेशाच्या विनाशास कारणीभूत ठरू शकतं असा इशारा दिला.
दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी फ्रान्सनेही पुढाकार घेतला आहे. फ्रान्सच्या विदेशमंत्र्यांनी 21 दिवसांच्या युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. यासाठी बेरुत दौरा करण्याचे नियोजन त्यांच्याकडून केलं जात आहे. आणखीही काही देशांनी दोन्ही देशांत शांततेचे आवाहन केले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, सौदी अरब आणि युएई या देशांचा समावेश आहे. हमासच्या अलीकडच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांत हल्ले सुरुच आहेत. मागील आठवड्यात इस्त्रायलने लेबनॉनमध्ये अनेक हल्ले केले होते.
मोठी बातमी! लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 100 जणांचा मृत्यू
या हल्ल्यांमध्ये तेथील 100 नागरिक मारले गेले तर 300 जण जखमी झाले. या लोकांमध्ये लहान मुले, महिला आणि कामगारांचा समावेश होता अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. लेबनॉनच्या दक्षिण भागाव्यतिरिक्त ईशान्य भागालाही इस्रायलने टार्गेट केले होते. लेबनॉनवर इस्रायलने 150 हवाई हल्ले केले ज्यामध्ये मोठ्या संख्येने हिजबुल्लाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले होते. ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलचे हमास आणि हिजबुल्लासोबत युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे.