China News : भारत पाकिस्तान तणावात चीन पाकिस्तानची (India Pakistan Tension) मदत करत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. आता चीनचा असाच एक (China News) कारनामा समोर आला आहे. चीनही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या अतिरेक्यांना प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव येतो त्या प्रत्येक वेळी चीन त्यात खोडा घालतो.
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तयार केलेल्या एका डोझियरमध्ये अब्दुल रऊफ असगर, साजिद मीर, अब्दूर रहमान मक्की, तल्हा सईद आणि शाहिद महमूद रहमतुल्ला या अतिरेक्यांवर प्रतिबंध रोखण्यात चीनची संलिप्ततेकडे इशारा करण्यात आला आहे. चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (United Nations Security Council) पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनांचे अतिरेक्यांवर प्रतिबंध लादणे आणि जागतिक पातळीवर त्यांना दहशतवादी म्हणून शिक्कामोर्तब करण्याचा भारताचा प्रस्ताव रोखला आहे.
पाकिस्तान घाबरला! डिफेन्स बजेटमध्ये वाढ करण्याची घोषणा; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक..
इकॉनॉमिक टाइम्सने दावा केला आहे की एनआयएच्या डोझियरमध्ये या पाच दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व अतिरेकी 26/11 हल्ला, 2019 मधील पुलवामा हल्ला, 2016 मधील पठाणकोट हल्ला, 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेला हल्ला आणि विमान अपहरणाच्या घटनांत सहभागी होते. या व्यतिरिक्त या अहवालात असेही म्हटले आहे की भारताने टीआरएफ दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी तीन प्रस्ताव दिले होते. पण सर्व प्रस्ताव चीनने रोखले. पहिला प्रस्ताव डिसेंबर 2023 मध्ये दिला होता. दुसरा प्रस्ताव मे 2024 मध्ये तर तिसरा प्रस्ताव फेब्रुवारी 2025 मध्ये दिला होता. या प्रस्तावालाही चीनने रोखले होते.
भारताने सिंधू पाणीवाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केल्यानंतर सध्या चीनच पाकिस्तानची मदत करत आहे. खैबर पख्तुनख्वामधील धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन चीनने दिले आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला वीज मिळेल तसेच पेशावर शहराची पाण्याची समस्या कमी होईल. यासाठी चीनी अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
J 35A चीनचे स्टील्थ फायटर जेट आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानला मार खावा लागला आहे ते पाहून चीनलाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी त्यामुळे पाकिस्तानी वायुसेनेकडे J35A लढाऊ विमाने असावीत असे चीनला वाटत आहे. भारताची कोंडी करण्याचाही चीनचा प्रयत्न आहे. यासाठी चीन विविध प्रकारे डावपेच टाकत आहे. बांगलादेशमध्ये एअरफील्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाकिस्तान प्रमाणेच बांगलादेशही चीनच्या तालावर नाचत आहे.
बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..