बांग्लादेश, अफगाणिस्तान, धरण अन् फायटर जेट; भारताच्या कोंडीसाठी चीनचे 4 मोठे डाव..

India China Relation : भारताविरोधात कोणतीही गोष्ट असो त्यात चीनचा हात निघतोच. ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान तर हादरला आहेच पण चीन जास्त हैराण झाला आहे. यामागे कारणही आहे. पाकिस्तान सध्या चीनची वसाहत झाला आहे. चीनने दिलेली हत्यारे सुद्धा (India China Relation) अपयशी झाल्याने चीन बिथरला आहे. अशा परिस्थितीत जर आता पाकिस्तान कमकुवत झाला तर चीन सुद्धा कमकुवत होईल यात शंका नाही. त्यामुळेच भारतीय सैन्याचे (Indian Army) अभियान आटोपल्यानंतर चीनने तातडीने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना बोलावून घेतले. याबरोबरच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही बीजिंगला बोलावून घेतले.
आता या तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मोठी बैठक झाली. यात भारतविरोधी चाली चीनने खेळल्याच. यात सर्वात महत्वाचे म्हणजे चीन पाकिस्तान दरम्यानचा सीपीइसी प्रोजेक्ट (China Pakistan Economic Corridor) अफगाणिस्तानात विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातील बिघडलेले संबंध सुरळीत करण्याचाही हेतू यामागे होता. आता चीनचा हा उद्देश कितपत सफल झाला हे येणारा काळच सांगेल.
चीन बांधतोय मोठं धरण
भारताने सिंधू पाणीवाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केल्यानंतर सध्या चीनच पाकिस्तानची मदत करत आहे. खैबर पख्तुनख्वामधील धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन चीनने दिले आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला वीज मिळेल तसेच पेशावर शहराची पाण्याची समस्या कमी होईल. यासाठी चीनी अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत.
ज्याची भीती होती तेच घडलं! CPEC प्रोजेक्ट थेट अफगाणिस्तानात नेणार ड्रॅगन, भारताला धोक्याची घंटा
पाकिस्तानला मिळणार J35A फायटर जेट
भारताविरुद्ध चीनची तिसरी चाल म्हणजे पाकिस्तानला J35A विमानांचा पुरवठा वेगाने करणे. J 35A चीनचे स्टील्थ फायटर जेट आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानला मार खावा लागला आहे ते पाहून चीनलाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी त्यामुळे पाकिस्तानी वायुसेनेकडे J35A लढाऊ विमाने असावीत असे चीनला वाटत आहे.
बांग्लादेशच्या मदतीने भारताची कोंडी
भारताची कोंडी करण्याचाही चीनचा प्रयत्न आहे. यासाठी चीन विविध प्रकारे डावपेच टाकत आहे. बांगलादेशमध्ये एअरफील्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाकिस्तान प्रमाणेच बांगलादेशही चीनच्या तालावर नाचत आहे. भारतीय बॉर्डरजवळ लालमोनिरहाट एअरबेस विकसित करण्याची तयारी चीन करत आहे. भारताच्या चिकन नेकच्या अगदी जवळ हा एअरबेस आहे. याद्वारे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण व्हावा असा चीनचा उद्देश आहे.
चीनी हत्यारे फेल झाल्याने चीन बिथरला..
भारताच्या ऑपरेशन सिंदूरने फक्त पाकिस्तानला नाही तर चीनलाही दणका दिला आहे. या छोट्याशा युद्धाने भारताची सैन्य ताकद काय आहे याची चुणूक जगाला दिसली आहे. सैन्याने टार्गेटवर अगदी अचूक निशाणा साधला. पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकले. जवळपास अकरा एअरबेस नष्ट करून टाकले. पाकिस्तानकडील चिनी हत्यारे अगदीच अपयशी ठरली. सगळ्या जगाने हा प्रकार पाहिला. त्यामुळे हत्यारे निर्यातीच्या बाबतीतील बाबतीत जगात मक्तेदारी निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
सिंधू करार स्थगित होताच पाकिस्तानच्या मदतीला चीन; पाणी अन् विजेसाठी चीनचा प्रोजेक्ट सुरू..
यामुळेच आता चीनकडून पाकिस्तानला J35A देण्याच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. पण भारताने चीनच्या या चलाखीवर तोडगा शोधला आहे. चीनचे हे लढाऊ विमान भारताविरुद्ध सर्वात मोठे हत्यार आहे असे पाकिस्तान समजू लागला आहे पण या विमानाला निकाली काढण्याची तयारी भारताने केली आहे. यासाठी भारताने एक खास टेक्निक शोधून काढली आहे.
खास टेक्निक नेमकं काय
पंचवीस वर्षांपू्र्वी रडार टेक्नॉलॉजीच्या बाबतीत भारत खूप मागे होता. अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कँन्ड ऐरे रडारचा वापर होत होता. भारताकडे ही टेक्निक नव्हती. परदेशातून खरेदी करून टेक्निक विमानांत बसवणे खूप खर्चिक होते. त्यामुळे भारताने यावर तत्काळ कार्यवाही सुरू केली आणि स्वदेशी रडार विकसित केले. आता भारताकडील रडार चीनच्या कोणत्याही फायटर विमानांना हाणून पाडण्यात सक्षम आहे.