China News : आपल्या विस्तारवादी धोरणासाठी चीनला ओळखले जाते. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये बेरोजगारी झपाट्याने वाढली आहे. त्यांची अर्थव्यवस्थेत सातत्याने घसरण होत आहेत. बाजाराची स्थितीही बिकट आहे पण या सगळ्यात कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
मंदीच्या काळात कंडोम विक्रीत होत असल्याने उत्पादक कंपन्यांच्या कमाईत प्रचंड वाढ होत आहे. एकीकडे अर्थव्यवस्था घसरत आहे आणि दुसरीकडे तरुण मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी करत आहेत, याचे चिनी अर्थतज्ज्ञांनाही आश्चर्य वाटत आहे.
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (NBS) च्या अहवालानुसार, चीनची किरकोळ विक्री मे महिन्यात 12.7 टक्क्यांच्या वाढीवरून जूनमध्ये 3.1 टक्क्यांवर आली आहे. किरकोळ विक्री आणि निर्यातीत मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम नोकऱ्यांवरही दिसू लागला असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार झाले आहेत.
बेरोजगार तरुण घरी बसले आहेत आणि हे देखील चीनमध्ये कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याचे कारण असल्याचे मानले जाते. चीनमधील कंडोम कंपन्यांचा नफा येथे दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोविडच्या काळातही चीनमध्ये कंडोमची विक्री वाढली होती.
आणखी एक तरुणी पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात, चौकशीतून धक्कादायक खुलासे
लॉकडाऊनमध्येही कंडोमची विक्री
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्युरेक्स कंडोमचे निर्माते रेकिट यांनी सांगितले की, चीनमध्ये प्रचंड मंदी असूनही लोक कंडोम खरेदी करत आहेत. त्याच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. कंडोमच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याने कंपन्या आणि गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. ड्युरेक्स कंपनीचे म्हणणे आहे की, चीनच्या बाजारात लॉकडाऊन असतानाही कंडोमच्या विक्रीत कोणतीही घट झाली नाही.
Rajasthan Election : राजस्थानात कुणाला धक्का? सर्व्हेतून मिळालं काँग्रेसला धडकी भरवणारं उत्तर
कंपनीचा व्यवसाय वाढला
कंपनीने सांगितले की त्यांच्या व्यवसायात 8.8 टक्के महसूल वाढ झाली आहे. भविष्यात कंपनी काही नवीन उत्पादने बाजारात आणू शकते असाही विचार ड्युरेक्स कंपनीकडून केला जात आहे. सध्या कंडोमची विक्री वाढल्याने अर्थतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत.