Download App

New Zealand Prime Minister : जसिंडा अर्डर्न यांचे उत्तराधिकारी होणार ख्रिस हिपकिन्स ?

  • Written By: Last Updated:

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ख्रिस हिपकिन्स जागा घेतील. जॅसिंडा अर्डर्न यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता खासदार क्रिस हिपकिन्स हे नवे पंतप्रधान बनतील अशी माहिती समोर येत आहे.

कोण आहेत ख्रिस हिपकिन्स ?

अर्डर्न यांच्या राजीनामानंतर ख्रिस हिपकिन्स न्यूझीलंडचे 41 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील. संसदेच्या मजूर पक्षाच्या सदस्यांकडून त्यांना औपचारिक पाठिंबा मिळाल्याची चर्चा आहे. हिपकिन्स पहिल्यांदा 2008 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते आणि नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना मंत्री करण्यात आले. हिपकिन्स हे सध्या पोलीस, शिक्षण आणि लोकसेवा खात्याचे मंत्री आहेत.

वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधानपदी निवड

जसिंडा अर्डर्न यांचा जन्म 26 जुलै 1980 रोजी न्यूझीलंड मधील हॅमिल्टन येथे झाला. त्याचे वडील रॉस आर्डर्न पोलिस अधिकारी आणि आई लॉरेल कुक होत्या. जेसिंडा यांना सुरुवातीपासून राजकारणात रस होता. म्हणूनच त्यांनी 2001 मध्ये वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी न्यूझीलंडच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश केला.

तत्कालीन पंतप्रधान हेलन क्लार्क यांच्यासाठी रिसर्चर म्हणून काम पहिले. 2017 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान झाल्या. तेव्हापासून अनेक कामामुळे आणि अडचणीच्या काळात चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या.

Tags

follow us