Syria Civil War Updates : देशातील अनेक शहरे बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. सीरियात सत्तापालटाच्या हालचालींनी वेग आला आहे. राष्ट्राध्यक्ष असद अल बशर देश सोडून रशियाला पळून गेल्याचे वृत्त आहे. (Syria) सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये सर्वात मोठा हल्ला करण्यात आला असून, तिथे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
सर्वात मोठी बातमी! अमेरिका आणि ब्रिटनकडून येमेनची राजधानी सानावर हल्ला
बशर सरकारचे एक विमान सीरियात घिरट्या घालताना दिसले, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, असद त्यांच्या कुटुंबासह त्या विमानातून परदेशात गेले आहेत. मात्र सरकारी सूत्रांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. असद आपली जबाबदारी पार पाडत आहेत. देशवासियांना सोडून ते कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं आहे.
लोक रस्त्यावर
सीरियातील परिस्थिती अधिक चिंताजनक होत चालली आहे, कारण आता सरकारच्या ताब्यातील भागही बंडखोरांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहेत. वृत्तानुसार, बंडखोरांनी आता उत्तर आणि पूर्व होम्समधील अनेक सरकारी सीमा उद्ध्वस्त केल्या आहेत. होम्स शहरातून सैन्य माघार घेतल्यानंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यानंतर त्यांनी ”असाद गेले, होम्स मुक्त झाले” अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.
आता त्यांची राजधानीला वेढा घालण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय, सीरियातील सर्वात कुख्यात तुरुंग सैदनायामधून कैद्यांना सोडण्याचा कट रचला जात असल्याचंही वृत्त आहे. विरोधी पक्षाचे अनेक नेतेही या तुरुंगात असल्याचं सांगितलं जात आहे.