Syria : असद राजवटीनंतर विदेशी कनेक्शन समोर; बंडखोर अमेरिकेच्या संपर्कात
Syria : सिरियामध्ये (Syria) राष्ट्रपती बशर असद यांची राजवट संपल्यानंतर आता नव्या राज्यकर्त्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत गीर पेडर्सन सिरीयाची राजधानी पोहोचले असून त्यांनी बंडखोरांना न्याय देण्यावर जोर दिला आहे. एका विश्वसनीय न्याय प्रणालीच्या माध्यमातून सुनिश्चित परिस्थित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं गीर पेडर्सन यांनी स्पष्ट केलंय.
‘गुम है किसी के प्यार में’मध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, साकारणार महत्वाची भूमिका
नव्या सिरीयाच्या निर्मीतीसाठी सर्वांनी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचे दुतावास गीर पेडर्सन यांनी दमिश्क यात्रेत स्पष्ट केलंय. यासोबतच त्यांनी बंडखोर नेत्यांसोबत चर्चाच करण्याचीही तयारी दर्शवली असून बंडखोर नेते अबू मोहम्मद अल जोलानी यांचीही त्यांनी भेट घेतली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच कतारधील एक शिष्टमंडळही या परिस्थितीत सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सिरीयात दाखल झालायं. सिरीयातील क्रांतीबाबत कतारकडून सिरीयातील नागरिकांना समर्थन दिलं असून सरकारविरोधात बंडाच्याविरोधात सुरुवातीपासून बंद होण्याआधीपासून कतारच्या दुतावास कतारमध्ये मंगळवारी दाखल झालायं.
पहिलं उत्पन्न ५ रुपये, नंतर मिळवली जगभरात ख्याती.. उस्ताद झाकीर हुसैन यांची यशस्वी वाटचाल
दरम्यान, अमेरिकेसह इतर देशांकडून बंडखोरांना एक आंतकवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. जो बायडन आणि बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (HTS) यांच्यातील संपर्कांची सार्वजनिकपणे पुष्टी करणारे ब्लिंकन हे पहिले अमेरिकन नेते आहेत. अमेरिकन अधिकारी असद सरकारला पदच्युत करणाऱ्या सीरियन बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) च्या संपर्कात असल्याची पुष्टी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी केलीयं.