72 तासांत इस्त्रायलच्या हल्ल्यांनी 6 मुस्लिम देश उध्वस्त; कतार ते येमेन कसे अन् किती हल्ले?
Isral Attacks मध्ये केवळ गाझाच नाही तर 72 तासांमध्ये इस्रायली सैन्याने सहा मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करत 200 लोकांना मारलं आहे.

Isral Attacks on 6 Muslim Countries during 72 hours : इस्त्रायल हमासच्या युद्धामध्ये पूर्ण पश्चिम आशिया हादरला आहे. यामध्ये 7 ऑक्टोबरपासून सातत्याने हल्ले केले जात आहे. यामध्ये केवळ गाझाच नाही तर सहा मुस्लिम राष्ट्रांना राष्ट्रांवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये गेल्या 72 तासांमध्ये इस्रायली सैन्याने सहा मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करत 200 लोकांना मारलं आहे. यामध्ये इस्त्रायलने कतारपासून येमेन, लेबनॉन, सीरिया यासारख्या कित्येक मुस्लिम देशांवर हल्ले केले. यावर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
इस्त्रायलच्या हल्ल्यांनी 6 मुस्लिम देश उध्वस्त
दरम्यान इस्रायल ने कतारची राजधानी दोहा जवळ केलेल्या हल्ल्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कतारने या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर लेबनॉनमध्ये हिस्बु्ल्लाहच्या तळांवर इस्त्रायलने हल्ले केले. यामध्ये बेका आणि हेयरमेल भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; मुंबई महानगरपालिकेने दिली परवानगी
त्यामुळे इस्त्रायल लेबनॉन सीमेवर परिस्थिती हाताबाहेर जात असून सातत्याने तणाव वाढत आहे. सीरियामध्ये देखील इस्त्रायलने हल्ले केले. मात्र या ठिकाणी मृतांची संख्या समोर आलेली नाही. तर ट्युनीशियामध्ये गाझामध्ये पाठवण्यात येणाऱ्या मदतीच्या जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसला. तरी ट्युनिशिया सरकारने यावर आंतरराष्ट्रीय तपास केला जावा अशी मागणी केली आहे. येमेनची राजधानी सना आणि अल जाऊ या भागामध्ये इजराइलने केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास 35 लोकांच्या मृत्यू आणि 130 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे हल्ले हुती बंडखोरांच्या तळांवर केल्याचे सांगण्यात येत आहे.
कुणाला धनलाभ तर कुणाला आरोग्य समस्या; जाणून घ्या तुमच्या राशीचे आजचे भविष्य
तसेच गाझावर तर इस्त्रायलचे हल्ले सातत्याने सुरूच आहेत. गेल्या 72 तासांमध्ये गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्यामध्ये 150 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हजारोंहून अधिक लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे गाजमध्ये मानवी जीवन संकटात सापडलं आहे.
नेपाळमध्ये आंदोलन करणाऱ्या GenZ मध्ये फूट, दोन गटात तुंबळ हाणामारी; अनेकजण जखमी
दरम्यान इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली. मात्र अद्याप कोणत्याही देशाने यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे तज्ञांकडून यावर चिंता व्यक्त केली जात आहे की, पश्चिम आशिया युद्धामध्ये तळपत असताना त्यामध्ये हस्तक्षेप न केल्यास संपूर्ण जग वेठीस धरलं जाऊ शकतं.