Covishield Covid Vaccine AstraZeneca admits Side Effects : कोरोना काळामध्ये जगभरातील नागरिकांसाठी दिलासादायक गोष्ट ठरली ती म्हणजे कोरोना लस. मात्र आता एका कोरोना लस बनवणाऱ्या कंपनीने या लसीचे शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याची कबूली दिली आहे. कोरोना लस बनवणारी कंपनी एस्ट्रझेनेकाने ब्रिटनच्या कोर्टात हे कबूल केलं आहे.
Salaar 2: प्रभासच्या ‘सालार’ सिक्वेलमध्ये कियारा अडवाणी दिसणार का? दिग्दर्शकांनी थेट सांगितलं
कंपनीने सांगितल की, त्यांच्या कोरोना लसीमुळे टीटीएस म्हणजे थ्रोम्बोसईटोपेनिया सिंड्रोम म्हणजे शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण करण्यास कारणीभूत ठरणारा दुष्पपरिणाम होऊ शकतात. ज्यामुळे व्यक्तीला स्ट्रोक येणे, ह्रदय बंद पडने यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर भारतासाठी देखील चिंताजनक बातमी आहे. कारण या कंपनीची कोविशील्ड नावाची कोरोना लस भारतात देखील नागरिकांना दिली गेली आहे.
मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष
भारतीय कंपनी सीरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया आणि एस्ट्रझेनेकाने एकत्र येत भारतात कोरोना लसीची निर्मिती केली होती. त्याचा वापर केवळ भारतच नाही. अनेक देशांमध्ये निर्यात केली गेली. काही ठिकाणी या लसीला व्हॅक्सजेवरिया म्हणून देखील ओळखलं गेलं. तर ब्रिटनमध्ये जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने या कंपनीवर खटला दाखल केला आहे.
Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला
त्याचं म्हणण आहे की, ही लस घेतल्यानंतर तो ब्रेन डॅमेजच्या समस्येला सामोरा गेला आहे. तसेच अनेक कुटुंबांनी याबद्दल तक्रार केली आहे. तसेच त्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ब्रिटनने या लसीवर बंदी घातली आहे. दरम्यान भारतात देखील असे मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे भारतात देखील कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाऊ शकते.