Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला

Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला

Swapnail Joshi Film will Release Tomorrow : स्वप्नील जोशी ( Swapnil Joshi ) म्हंटल की डोळ्यासमोर एखादा छान रोमँटिक चित्रपट ( Film ) नक्कीच येतो पण या वेळी चित्र थोड वेगळं आहे स्वप्नील निर्मात्याच्या भूमिकेत आहे आणि म्हणून ” नाच गं घुमा ” सारखा चित्रपट घडतोय! सोशल मीडिया वर चित्रपटाच्या चर्चांना उधाण असताना स्वप्नील अभिनयाच्या सोबतीने निर्मिती देखील उत्तम करणार यात शंका नाही. प्रत्येक प्रमोशनला आवर्जून हजेरी लावत स्वप्नीलने “नाच गं घुमा” चित्रपटातील स्टार कास्ट सोबत खूप धमाल केली आहे.

हास्याची मेजवानी… ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’चं बीटीएस व्हिडीओ पाहिलंत का?

प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपणार असून उद्या नाच गं घुमा चित्रपटगृहात प्रदर्शित ( Release Tomorrow ) होणार आहे. याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. स्वप्नीलचा निर्मिती म्हणून असलेला हा पहिला वहिला चित्रपट आहे.

Ayushmann Khurrana : युथ आयकॉनने न्यूयॉर्कमधील युनिसेफच्या मुख्यालयाला दिली भेट, म्हणाला…

स्वप्नील सांगतोय ” बघता बघता उद्या आमचा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही त्याला भरभरून प्रेम द्याल यात शंका नाही. निर्मिती करायचं दडपण होत पण प्रमोशन आणि सोशल मीडिया वरून या चित्रपटाला तुम्ही जे प्रेम देताय ते बघून खूप आनंद होतोय. मला अभिनेता म्हणून जसं स्वीकारलं तसच एक निर्माता म्हणून देखील आपलंसं करून घ्याल याची खात्री आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला मोजून काही तास उरले आहेत पण आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.”

शिंदेंचं ठरलं! उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

यंदाच्या वर्षात स्वप्नील अजून एका भन्नाट स्त्रियांच्या चित्रपटात दिसणार आहे आणि तो म्हणजे ” बाई गं ” या बद्दल लवकरच तो प्रेक्षकांना सांगणार असल्याचं कळतंय. ” नाच गं घुमा ” नंतर आता ” बाई गं ” आणि ” जिलबी ” अश्या दर्जेदार चित्रपटातून स्वप्नील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube