Download App

Queen Elizabeth : ऑस्ट्रेलियाच्या चलनी नोटांवरुन ‘महाराणी’ हद्दपार

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियातील (Australia)चलनी नोटांबद्दल मोठा निर्णय (Queen Elizabeth)घेण्यात आलाय. येथील नोटांवरुन महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियामधील रिझर्व्ह बँकेच्या (Australian Reserve Bank) दिलेल्या माहितीनुसार नव्या पाच डॉलरवर आता स्वदेशी नक्षी असणारंय. त्यामुळं या नोटांवर असलेला राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II)यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

गतवर्षी 2022 सप्टेंबर मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाला. राणीचा फोटो ऑस्ट्रेलियामधील चलनी नोटांवर होता. आता यापुढं मात्र राणी एलिझाबेथ यांचा फोटो नोटांवर छापला जाणार नसल्याचं सांगण्यात आलंय.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, पाच डॉलरच्या नोटेवर महाराणी एलिझाबेथ यांचा फोटो होता. महाराणी एलिझाबेथ यांचं व्यक्तिमत्त्व दर्शवणारा तो फोटो होता. आता आम्ही आमच्या चलनी नोटा अपडेट करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं आम्ही हा फोटो यापुढं नोटांवर छापणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ऑस्ट्रेलियामधील नव्या चलनी नोटांवर ऑस्ट्रेलियाची संस्कृती दाखवणारी प्रतीकं आणि इतिहास असणारंय. तर एका भागावर ऑस्ट्रेलियाची संसद असणारंय. यापूर्वी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियानं त्यांच्या राष्ट्रगीतामध्येही काही बदल केले.

Tags

follow us