Download App

Delhi Earthquake : दिल्लीला पुन्हा भूकंपाचा धक्का

  • Written By: Last Updated:

दिल्ली आणि दिल्ली परिसरामध्ये आज मंगळवारी दुपारी 2:28 वाजता 30 सेकंद भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 5.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत आणि चीनपर्यंत जाणवला.

यावर्षीच्या वर्षाच्या सुरुवातीपासून राजधानीतील भूकंपाची ही तिसरी घटना आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

याआधी ५ जानेवारीला दिल्ली-एनसीआर आणि काश्मीरमध्ये संध्याकाळी ७.५६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 इतकी होती. त्याचे केंद्र हिंदुकुश क्षेत्र होते, अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 79 किमी.

नववर्षाच्या सुरुवातीलाही दिल्ली हादरली होती

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही दिल्लीतही भूकंपाचा धक्का जाणवला होता. पहाटे 1:19 वाजता 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र हरियाणातील झज्जर येथे होते. त्याची खोली जमिनीखाली 5 किमी होती. जरी त्यात कोणतीही हानी झाली नाही.

Tags

follow us