Download App

हुकूमशाह किम जोंग घाबरला; उत्तर कोरियाकडून पुन्हा मिसाईल चाचणी

प्योंगयांग : अमेरिका (America)आणि दक्षिण कोरिया (south korea)यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावामुळं (Military drills)उत्तर कोरियाचा (North korea) हुकूमशहा किम जोंग घाबरला (kim jong un)पाहायला मिळतंय. लष्करी कवायती सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियानं दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी (Test of ballistic missiles)घेतली आहे. त्याआधी सोमवारी उत्तर कोरियानं पाणबुडीवरून दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. आता उत्तर कोरियानं पूर्व महासागरात मिसाईलची चाचणी करुन शेजारी देशांवर एक प्रकारे धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं एका निवेदनात म्हटलं आहे की, नैऋत्य किनारी शहर जांग्योंग येथून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्रं देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळील समुद्रात खाली पडण्यापूर्वी उत्तर कोरियावर उंच उडून गेली. दोन्ही क्षेपणास्त्रांनी सुमारे 620 किलोमीटर (385 मैल) अंतर पार केलं, असंही निवेदनात म्हटलं आहे.

म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या

उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्रांची चाचणी ही दक्षिण कोरियाला लक्ष्य करण्यासाठी केली होती. त्यामध्ये जवळपास 28 हजार अमेरिकन सैनिक आहेत. दक्षिण कोरियाच्या सैन्यानं या प्रक्षेपणाला गंभीर चिथावणी दिली. त्यांनी म्हटलंय की यामुळं कोरियन द्वीपकल्पातील स्थिरता कमी झाली आहे.

13 ते 23 मार्च दरम्यान अमेरिका आणि दक्षिण कोरियातील लष्करी सरावामुळं उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग इतका घाबरला आहे की, ते थांबवण्यासाठी त्यानं संयुक्त राष्ट्राचा (UN) सहारा घेतला आणि किम जोंगच्या सरकारनं याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांना (UN) आवाहन केलं आहे. हा लष्करी सराव थांबवण्याची मागणी केली होती.

Tags

follow us