Download App

ट्रम्प अजबच! टॅरिफच्या नावाखाली सोयाबीन विक्रीसाठी आटापिटा; अमेरिकेकडून चीनची मनधरणी

चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.

US China Trade : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताविरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. परंतु, चीनला कायमच (US China Trade) धारेवर धरणारे ट्रम्प यांनी अचानक यूटर्न घेतला आहे. टॅरिफ युद्धाच्या सुरुवातीनंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध टोकाला पोहोचलं होतं. परंतु, आता दोन्ही देशांत वाद बऱ्यापैकी निवळला आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दिलासा दिला आहे. टॅरिफ लागू करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच आणखी एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे चीनने अमिरेकेचे सोयाबीन खरेदी करावे अशी इच्छा ट्रम्प प्रशासनाकडून चीनची मनधरणी केली जात आहे.

चीनला तीन महिन्यांचा दिलासा

सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा दिलासा दिला. चीनवर लागू होणाऱ्या टॅरिफला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. म्हणजेच चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर तीन महिने कोणताही टॅरिफ आकारला जाणार नाही. याआधी 2 एप्रिलला जेव्हा ट्रम्प यांनी जगातील विविध देशांवर टॅरिफ लादण्यास सुरुवात केली होती त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र दीर्घ चर्चेनंतर टॅरिफचा निर्णय तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता चीनसाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा! सोन्यावर कोणताही टॅरिफ आकारणार नाही; भारताला दिलासा

12 ऑगस्टला संपणार होती मुदत

चीनला दिलेली टॅरिफवरील विशेष सवलत 12 ऑगस्टला संपणार होती. ही मुदत संपण्याआधीच आणखी तीन महिन्यांची मुदत जाहीर करण्यात आली. जिनेव्हा येथे झालेल्या बैठकीनंतर चीनी वस्तूंवरील टॅरिफ कमी करून 30 टक्के तर चीनकडून अमेरिकी वस्तूंवर टॅरिफ 10 टक्के करण्यात आला होता. यासह दुर्मिळ धातूंची निर्यात चीनने पुन्हा सुरू केली होती. अमेरिकेने सुरुवातीला चीनवर तब्बल 145 टक्के टॅरिफ आकारला होता.

सोयाबीन विक्री करण्यासाठी आटापिटा

चीनने अमेरिकी सोयाबीनची खरेदी वाढवावी अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्यक्त केली. या माध्यमातून दोन्ही देशांतील व्यापार तूट देखील कमी होईल असे सांगण्यात आले. या संदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात म्हटले आहे की चीन सोयाबीनच्या टंचाईने काळजीत पडला आहे. आमचे शेतकरी जास्त उपज असणाऱ्या सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. चीन लवकरच सोयाबीनच्या ऑर्डरमध्ये चार पट वाढ करील अशी अपेक्षा आहे. चीनचा हा संभाव्य निर्णय अमेरिकेबरोबरील त्याचा व्यापात तोटा देखील बऱ्यापैकी कमी करील. यानंतर ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी थँक्यू देखील म्हटलं.

ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला…,पण.. भारतावर परिणाम शून्य..कसा?

follow us