Download App

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात? न्यायालयाकडून अटक करण्याचे आदेश

Image Credit: letsupp

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली.

Independence Day 2023: लालकिल्ल्यावरील सुंदर दृश्य पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल

ग्रँड ज्युरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकुण 13 आरोप ठेवण्यात आले असून यामध्ये जर्जियाचा निवडणूक निकाल बदलण्याचा कट, RICO, खोटी कागदपत्रं दाखल करणे, सार्वजनिक अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेचं उल्लंघन यासोबतच इतरही आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच जर्जियाच्या खासदारांचं मतांतर करणं, फसवणूक, बोगस दावे केल्याचा आरोपही आहे.

पवारांच्या लेकीची खासदारकी जाणार? बारामतीच्या किल्ल्यावर मित्रपक्षानेच ठोकला दावा

ट्रम्प यांचा पराभव मान्य केला नव्हता. यामुळे जाणून बुजून, बेकायदेशीरपणे निकालांचे पराभव ट्रम्प यांच्या बाजूने बदलण्याच्या कटामध्ये ट्रम्प यांच्यासह 18 साथीदार सहभागी असल्याचं आरोपपत्रात फॅनी यांनी म्हटलं आहे.

Ahmedangar Crime : स्मशानभूमीत दारुड्यांकडून महिलेचा विनयभंग, नगर शहरातील घटना…

या प्रकरणात ट्रम्प यांच्यासह व्हाईट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडोज, न्यूयॉर्कचे माजी मेयर रुडी गिउलियानी आणि ट्रम्प सरकारमधील न्याय विभागाचे अधिकारी जेफरी क्लार्क यांचा समावेश आहे.

14 ऑगस्टला पाकिस्तान त्यांचा स्वातंत्र्य दिन का साजरा करतो?

न्यायालयाने ट्रम्प यांच्या अटकेचे निर्देश दिल्यानंतर इतर 18 साथीदारांना आत्मसमर्पण करण्यासाठी शुक्रवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलीयं.

दरम्यान, ट्रम्प यांची 20 जानेवारी 2021 पासून राष्ट्राध्यक्ष करण्याची योजना आखली जात होती. त्याचवेळी मतांची मोजणी रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले असल्याचंही फॅनी यांनी आरोपपत्रात म्हटलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज