Download App

‘हश मनी केस’ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, तुरुंगात जावे लागणार नाही

Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना

  • Written By: Last Updated:

Hush Money Case: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी केस’ (Hush Money Case) प्रकरणात सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना या प्रकरणात तुरुंगात जावे लागणार नाही आणि दंडही भरावा लागणार नाही.

हश मनी केस प्रकरणात एका पॉर्न स्टारला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याचे आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आले होते. आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांची सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्तता केली. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये परतण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

मॅनहॅटन कोर्टाचे न्यायाधीश जुआन एम मर्चन (M Merchan)  ‘हश मनी’ प्रकरणात ट्रम्प यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकले असते मात्र त्यांनी असा निर्णय निवडला ज्याने अनेक संवैधानिक मुद्दे उद्भवण्यापासून रोखले आणि प्रभावीपणे खटला निकाली काढला. त्यामुळे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना औपचारिक शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रकरण काय ?

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स काही बोलू नये यासाठी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान ट्रम्पने आपल्या एका सहाय्यकामार्फत स्टॉर्मी डॅनियल्सला 1,30,000 अमेरिकन डॉलर्स देण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्पने सर्वोच्च न्यायालयाला एका पॉर्न स्टारला पैसे देऊन तिचे तोंड बंद ठेवण्याच्या प्रकरणात शिक्षा स्थगित करण्याची विनंती केली होती.

आनंदाच्या क्षणी पहिला फोन कोणाला करतात? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ उत्तर

सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र आज न्यायमूर्ती मार्चन यांनी ट्रम्प यांना तुरुंगवासाची शिक्षा देणार नाहीत किंवा त्यांच्यावर कोणताही दंड किंवा निर्बंध लादणार नसल्याची माहिती दिली.

follow us