आनंदाच्या क्षणी पहिला फोन कोणाला करतात? पंतप्रधान मोदींनी दिले ‘हे’ उत्तर
PM Modi Podcast : झेरोधाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामथ (Nikhil Kamath) यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पॉडकास्टमध्ये (PM Modi Podcast) त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहे. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सर्वात आनंदाच्या क्षणी ते फक्त त्यांच्या आईलाच फोन करायचे आणि त्यानंतर त्यांना कोणाला फोन करावासा वाटत नाही असा खुलासा त्यांनी या पॉडकास्काटमध्ये केला आहे.
या पॉडकास्टमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना विचारले होते की, त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणी कोणाला फोन करतात किंवा कोणाला फोन करू इच्छितात. या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला फक्त माझ्या आईला फोन करण्यास आवड होते मात्र आता असं काही राहिले नाही.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा आपण जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) लाल चौकात तिरंगा फडकवणार होतो. त्यानंतर संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पंजाबमधील पगवाडा येथे हल्ला झाला, ज्यामध्ये 5 ते 6 लोक मारले गेले. तथापि, आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला. तिथे काय होईल याची संपूर्ण देशाला चिंता होती. बरं, आम्ही तिथे आमचा तिरंगा फडकवला. त्यानंतर, जेव्हा आम्ही जम्मूला परत आलो, तेव्हा मी तिथून पहिला फोन माझ्या आईला केला. हा एक आनंदाचा प्रसंग होता आणि त्याच वेळी मला वाटले की माझी आई काळजीत असेल. मग मी त्यांना फोन केला. मात्र आज आई माझ्यासोबत नाही तेव्हा मला त्या फोन कॉलचे महत्त्व कळत आहे. त्यामुळे आता मला कधीच कोणाला फोन करावासा वाटत नाही असं पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे. याच बरोबर या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या सर्व घटनांवर भाष्य केले.
पंतप्रधान मोदींनी या पॉडकास्टमध्ये जागतिक राजकारण, देशांतर्गत राजकारण, भाजप आणि त्यांच्यानंतर देशाचे भविष्य काय असेल याबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.
मोठी बातमी! सावरकर प्रकरणातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना जामीन
तर या पॉडकास्टमध्ये गोध्रा दंगलीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा मी ट्रेनने तिथे पोहोचलो तेव्हा मला खूप वाईट वाटले. एवढेच नाही तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीसोबतच्या त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंबद्दल पंतप्रधान म्हणाले की, ते या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत.