Elon Musk-Donald Trump Controversy Know what is Epstein files : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील वाद शिघेला पोहचलेला असतानाच मस्क (Elon Musk) यांनी आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देताना मस्कने एपस्टाईन फाइल्सचा उल्लेख केला आहे. ही फाईल नेमकी काय आहे? याबद्दल जाणून घेऊया…
मस्कची पोस्ट नेमकी काय?
मस्कने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आता खरा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे नाव एपस्टाईन फाइल्समध्ये आहे. या फाइल्स कधीही सार्वजनिक न होण्याचे हेच खरे कारण असल्याचे म्हणत ‘डीजेटी, तुमचा दिवस शुभ जावो’ असे उपहासात्मकपणे लिहिले आहे. या पोस्टनंतर मस्कने आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्याने ‘ही पोस्ट भविष्यासाठी सेव्ह करून ठेवा, सत्य बाहेर येईल असे सूचक शब्दही लिहिले आहेत.
Time to drop the really big bomb:@realDonaldTrump is in the Epstein files. That is the real reason they have not been made public.
Have a nice day, DJT!
— Elon Musk (@elonmusk) June 5, 2025
मस्कच्या पोस्टवर ट्रम्प यांचे प्रत्युत्तर
इलॉन मस्कच्या फाईलबाबतच्या पोस्टवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यात त्यांनी मस्क आता माझ्या विरोधात गेले आहेत, याचा मला काही फरक पडत नाही. पण त्यांनी हे आधीच करायला हवे होते. काँग्रेससमोर सादर केलेले हे सर्वात महत्त्वाचे विधेयक असल्याचे सांगत यामध्ये १.६ ट्रिलियन डॉलर्सचा खर्च कमी करण्यात आला आहे. यामध्ये इतिहासातील सर्वात मोठी कर कपात करण्यात आली असल्याचेही ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जर हे विधेयक मंजूर झाले नाही तर, कर 68 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मला फक्त चूक दुरुस्त करायची असून, असे झाल्यास हे विधेयक अमेरिकेला आणखी महान बनवेल.
आता ट्रम्प तात्या नव्हे तर, म्हणायचं TACO; जाणून घ्या नावाचा अर्थ अन् नाव देण्यामागचं कारण…
एपस्टाईन फाइल्स काय?
जेफ्री एपस्टाईन हा एक अब्जाधीश आणि कुप्रसिद्ध फायनान्सर होता, त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी यासारख्या गंभीर आरोप होते. त्याच वेळी, २०१९ मध्ये एपस्टाईनच्या अटकेनंतर त्याचा संशयास्पद परिस्थितीत तुरुंगात मृत्यू झाला. आता जेफ्रीच्या संपर्क यादीला एपस्टाईन फाइल्स म्हणतात, जी न्यायालयाने बराच काळ सील केली आहे. एपस्टाईनच्या क्लायंट लिस्टबद्दल, म्हणजेच त्याच्या हाय-प्रोफाइल ग्राहकांच्या यादीबद्दल अमेरिकेत सतत वादविवाद सुरू असतात. या फाईल्समध्ये डझनभर प्रभावशाली व्यक्तींची नावे असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये राजकारणी, उद्योगपती आणि हॉलिवूड स्टार यांचा समावेश असू शकतो.
ट्रम्प यांनी स्वीकारली होती मैत्री
२००२ मध्ये न्यू यॉर्क मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “मी जेफला १५ वर्षांपासून ओळखतो. तो एक अद्भुत माणूस आहे, त्याच्यासोबत राहणे खूप मजेदार आहे. त्याला माझ्यासारख्याच सुंदर महिला आवडतात असे म्हटले जाते आणि त्यापैकी बऱ्याच तरुणी आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्या मैत्रीला तडे, मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर; सल्लागार पद सोडलं
जेफ्री एपस्टाईन कोण होते?
बीबीसीच्या वृत्तानुसार, एपस्टाईनचा जन्म आणि वाढ न्यू यॉर्कमध्ये झाली, जिथे ते १९७० च्या दशकात खाजगी डाल्टन स्कूलमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकवत होते. एपस्टाईनच्या एका विद्यार्थ्याचे वडील इतके प्रभावित झाले की त्यांनी एपस्टाईनची ओळख वॉल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट बँक बेअर स्टर्न्समधील एका वरिष्ठ भागीदाराशी करून दिली. चार वर्षांत, एपस्टाईन स्वतः तिथे भागीदार बनले.
१९८२ मध्ये त्यांनी स्वतःची फर्म, जे एपस्टाईन अँड कंपनी स्थापन केली. कंपनीने ग्राहकांच्या १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले. एपस्टाईन एक लग्जरी जीवन जगू लागला. त्यांनी आलिशान घरे आणि फार्म हाऊस खरेदी केले. त्यांच्या न्यू यॉर्कमधील घरी राजकारण्यांपासून ते चित्रपटातील सर्व सेलिब्रिटी येत असत.