डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्या मैत्रीला तडे, मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर; सल्लागार पद सोडलं

डोनाल्ड ट्रम्प अन् एलन मस्क यांच्या मैत्रीला तडे, मस्क ट्रम्प सरकारमधून बाहेर; सल्लागार पद सोडलं

Elon Musk News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास मानले जाणारे एलन मस्क यांनी (Elon Musk) ट्रम्प यांची साथ सोडली आहे. मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडले आहेत. नोकरशाहीत कपात आणि त्यात सुधारणा करण्यासाठी काम करणाऱ्या मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे (Donald Trump) वरिष्ठ सल्लागाराचे काम थांबवले आहे.

एलन मस्क यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा कालावधी आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे मी राष्ट्रपती ट्रम्प यांना मला संधी दिली म्हणून धन्यवाद देऊ इच्छितो. DOGE मिशन अधिक मजबूत होईल कारण हेच सरकार चालवण्याची एक पद्धत बनेल. मस्क यांनी ही घोषणा करण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. ट्रम्प यांच्या Big Beautiful विधेयकावर मस्क यांनी जोरदार टीका केली होती.

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी एलन मस्क यांना विशेष सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त केली होते. यानुसार मस्क वर्षातील 130 दिवस सरकारी कामात सल्ला देत राहतील. 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून मे अखेरपर्यंत ही मुदत पूर्ण होत आहे. व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सेमाफोरा सांगितले की विशेष सरकारी कर्मचाऱ्याच्या रुपात मस्क यांची ऑफबोर्डिंग बुधवारी रात्रीपासून सुरू होईल. ट्रम्प सरकारमधून बाहेर पडण्याआधी मस्क यांनी ट्रम्प यांच्या Big Beautiful विधेयकावर टीका केली होती. यात मल्टी ट्रिलियन डॉलर्सचा टॅक्स ब्रेक आणि संरक्षण खर्चात वाढ करण्यााचे आश्वासन देण्यात आले होते.

‘व्हाट द हेल’; युक्रेनवर रशियाचा पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया

या बिलामुळे मी खूप निराश झालो आहे. या विधेयकात कर कपात आणि वाढीव इमिग्रेशन यांचे मिश्रण आहे. यामुळे खर्चात मोठी वाढ होणार आहे. तोटाही वाढणार आहे. यामुळे DOGE विभागाच्या कामकाजावर परिणाम होईल असे मस्क म्हणाले होते. यानंतर मस्क यांनी सरकामधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या राजकारणात या घडामोडीवर जोरदार चर्चा सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्पचा नवा फतवा…अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांचं पुन्हा टेन्शन वाढलं, सोशल मीडिया वेटिंग म्हणजे काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube