‘व्हाट द हेल’; युक्रेनवर रशियाचा पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया

Donald Trump on Ukraine-Russia War : रशियाने आता पुन्हा एकदा युक्रेनला लक्ष्य केलं. (Ukraine) याचा अर्थ रशिया आणि युक्रेन युद्ध अद्यापही थांबलेले नाही. खरे तर, यावेळी रशियाने युक्रेनवर मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया आली आहे. या हल्ल्यात रशियाने 367 ड्रोन आणि मिसाइल्सचा वापर केल्याचं समजतं.
डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार
मी पुतीन यांच्यावर नाराज आहे. लोक मरत आहेत. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आमचे चांगले संबंध आहेत. मात्र, आता ते रॉकेट्स डागत आहेत. हे मला अजिबात मान्य नाही. ते क्रेझी व्यक्ती आहेत. हे योग्य नाही. एवढंच नाही, तर ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासाठी ‘व्हाट द हेल’ सारखे शब्दही वापरले आहेत.
युक्रेनमध्ये घबराट
युक्रेनमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यासाठी रशियाने २९८ ड्रोन आणि ६९ क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण युक्रेनमध्ये घबराटीचे वातावरण आङे.क्रेनच्या अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात बोलताना, आपण ४५ क्षेपणास्त्रे पाडली असून २६६ ड्रोन देखील नष्ट केल्याचे युक्रेनियन हवाई दलाने म्हटले आहे. या हल्ल्यात कीव शहराचे मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही देशातील युद्ध अद्यापही थांबलेले नाही.
काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावरही निशाणा साधला. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात, झेलेन्स्की यांची चर्चेची पद्धत देशाचे भले करू शकत नाही. त्यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द समस्या वाढवत आहे. मला हे बरं वाटत नाही. हे थांबवायला हवं असंही ते म्हणाले आहेत.