मोठी बातमी! युक्रेनचा रशियावर वादळी ड्रोन हल्ला; सुमारे ४० पेक्षा अधिक युद्धक विमाने केली लक्ष

मोठी बातमी! युक्रेनचा रशियावर वादळी ड्रोन हल्ला; सुमारे ४० पेक्षा अधिक युद्धक विमाने केली लक्ष

Ukraine-Russia war : युक्रेन-रशिया युद्ध थांबेल अशी चर्चा असतानाच ते आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचं दिसतय. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे, असा दावा युक्रेनी माध्यमांनी केला आहे. (war) या हल्ल्यात रशियाचे 40 पेक्षा अधिक युद्धक विमाने नुकसानीसाठी लक्ष्य ठरली असून त्यात अत्याधुनिक A-50, TU-95 आणि TU-22M3 विमानांचाही समावेश आहे.

रशियावर थेट घाव

हा हल्ला अत्यंत रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा होता आणि त्यामागील प्रमुख हेतू रशियाच्या हवाई शक्तीला कमकुवत करणं हा होता. हा हल्ला रशियाच्या विविध लष्करी विमानतळांवर करण्यात आला. मात्र, रशियाने अद्याप या हल्ल्यामुळे एवढ्या मोठ्या नुकसानीची औपचारिक पुष्टी दिलेली नाही. मात्र, त्यांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केल्याचं स्पष्ट केलं आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ, त्या खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी युक्रेनच्या खार्कोव्ह प्रदेशात ‘इस्कांडर-M’ क्षेपणास्त्राने हल्ला करून 6 ड्रोन लॉन्चर आणि सुमारे 30 मानवरहित हवाई वाहनं (UAV) नष्ट केली आहेत. त्याचबरोबर ड्रोन हल्ल्यांचे स्रोत देखील निष्क्रिय केल्याचा दावा केला आहे.

पहिल्यांदाच ड्रोन हल्ला

या संपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साइबेरियामधील इरकुत्स्क भागात पहिल्यांदाच ड्रोन हल्ला नोंदवला गेला आहे. या हल्ल्यात एक सैन्य तळ लक्ष्य करण्यात आला असून स्थानिक गव्हर्नरने याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की लष्कर आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube