8647 कोड… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? प्लॅन नेमका कोणाचा…

James Comey Instagram Post Seen AS Death Threat For Donald Trump : अमेरिकेच्या (America) तपास यंत्रणेचे माजी प्रमुख जेम्स कोमी यांच्या (James Comey) एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या (Instagram Post) देशात खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर असे करून तो अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) समर्थकांनी त्यांच्या पोस्टचा संबंध ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाशी जोडला.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार , जेम्स कोमीने इन्स्टाग्रामवर सीशेलचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत ‘8647’ ही एक संख्या होती. कोमीने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ट्रम्पच्या समर्थकांनी या पोस्टचा संबंध अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या (Death Threat For Donald Trump) हत्येच्या कटाशी जोडले. खरं तर, एका अमेरिकन म्हणीमध्ये, 86 हा आकडा एखाद्या गोष्टीपासून मुक्त होण्याशी संबंधित आहे. ट्रम्प समर्थकांनी 47 ला राष्ट्राध्यक्ष ट्रम्पशी जोडले. कारण ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. अशाप्रकारे 8647 हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी प्राणघातक धोका मानला जातोय.
Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत ‘नरकातला स्वर्ग’ का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत
या सर्व घडामोडींमुळे जेम्स कोमी हे ट्रम्प समर्थकांचे लक्ष्य बनले. या फोटोवरून वाद झाल्यानंतर, कोमीने पोस्ट डिलीट केली. यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनियर याने या पोस्टला सर्वप्रथम लक्ष्य केलं. त्यांनी म्हटलंय की, माझ्या वडिलांविरुद्धचे षड्यंत्र आहे, ज्याला डेमोक्रॅट्सनी प्रोत्साहन दिले आहे. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांच्यासह ट्रम्प प्रशासनाच्या अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनीही या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी लिहिलंय की, या पोस्टला कमी लेखता येणार नाही. कारण राष्ट्रपतींच्या हत्येचे प्रयत्न यापूर्वी दोनदा झाले आहेत.
मी काही शंखांचे फोटो पोस्ट केले. त्या शंखांना मी समुद्रकिनाऱ्यावर चालत असताना पाहिलं होतं. यातून काही राजकीय संदेश जाईल, हे मला माहित नव्हते. काही लोक संख्यांना हिंसाचाराशी जोडतात. हा विचार माझ्या मनात आलाच नाही. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करतो, म्हणून मी ती पोस्ट काढून टाकली आहे, असं पोस्टवर उत्तर देताना जेम्स कोमी यांनी म्हटलंय.