Download App

भारतावर नवीन संकट! तेल-गॅस पुरवठा बंद होणार? ट्रम्प यांचे युरोपियन देशांना आदेश…

Donald Trump Order To European Countries : भारताने (India) रशियाकडून तेल खरेदी थांबवावे, असा थेट दबाव अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताने अमेरिकेचे ऐकले नाही. त्यानंतर अमेरिकेने भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) माघार घेतली नाही. परिणामी ट्रम्प अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी भारताविरोधात उघडपणे वक्तव्य करायला सुरुवात केली. अमेरिकेकडून (America) येणाऱ्या या धमक्या पाहता, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी असलेला फोनवरील संवादही थांबवला, अशी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान युद्धाच्या संदर्भातही वादग्रस्त विधान

भारत-पाकिस्तान संबंधांबाबतही डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त आणि धक्कादायक विधानं केली होती. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, त्यामुळे ट्रम्प यांनी आणखी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला होता. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसने युरोपीयन देशांनाही (European Countries) आदेश दिले आहेत की, जसा अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी टॅरिफ आणि निर्बंध (Oil Gas Supply) लादले, तसेच निर्बंध तुम्हीही लावा. भारताला युरोपातून जाणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर तातडीने मर्यादा आणा, अशा सूचना ट्रम्प प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

महिन्याच्या अखेरीस धनलाभाची संधी! ‘या’ राशींवर होणार माता लक्ष्मीची कृपा

भारतासाठी नवीन संकटाची चिन्हे

अमेरिकेच्या या हालचालीनंतर आता युरोपीयन देश कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुळात ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादल्यानंतर ट्रम्प यांनी भारताला स्पष्ट इशारा दिला होता की, जर रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर आणखी कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे भारताला टॅरिफसोबतच आता नव्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

ते अनेक वर्षे सत्तेत होते.., आता मला जास्त खोलात जायला नका लावू, शरद पवारांवर अजित पवारांचा घाव

अमेरिकेचे म्हणणे काय?

अमेरिकेच्या मते, भारत हा रशियाकडून तेल विकत घेतल्यामुळे युक्रेन युद्धासाठी रशियाला मोठा आर्थिक आधार मिळतो. जर युरोपीयन देशांनी भारताला तेल आणि गॅसचा पुरवठा बंद केला, तर याचे गंभीर परिणाम भारतावर होतील. त्यासोबतच, “भारतावरही आमच्याप्रमाणेच प्रतिबंध आणि टॅरिफ लागू करा,” असे ट्रम्प यांनी युरोपला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

ट्रम्पची सर्वात मोठी चिंता

भारत, चीन आणि रशिया हे तीन देश जवळ येत असल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ट्रम्प भारताला रशिया-चीन गटापासून दूर ठेवण्यासाठी प्रचंड दबाव आणत आहेत. मात्र भारताने अजूनही आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवली आहे.

 

follow us