Download App

डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार

Donald Trump यांनी मॉस्कोच्या तेल निर्यातीवर अतिरिक्त 25 ते 50 टक्के दुय्यम शुल्क लादण्याची धमकीही दिलीय. त्याचा अनेक देशांवर थेट परिणाम.

  • Written By: Last Updated:

Donald Trump threatens secondary tariffs on Russian oil : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे जगावर आपले वर्चस्व वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्यातून ते अनेक देशांच्या वस्तूंवर अतिरिक्त कर (tariff) लावत आहेत. तर आता ट्रम्प यांनी रशियावर डोळे वटारले आहेत. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्धबंदीबाबत कोणताही करार न झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर संतापले आहे. तर यापूर्वी युक्रेनेचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर त्यांनी आगपाखड केलेली आहेत. आता ट्रम्प यांनी रशियाला उघड उघड एक धमकी दिलीय. रशियाने एका महिन्याच्या आत युद्धबंदीला सहमती दर्शवली नाही तर मॉस्कोच्या तेल निर्यातीवर अतिरिक्त 25 ते 50 टक्के दुय्यम शुल्क लादण्याची धमकीही दिलीय. त्यामुळे रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांना याचा फटका बसू शकतो. ट्रम्प यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या टेलिफोन मुलाखतीत असे संकेत दिले.

“झापुक झुपूक” मध्ये दिसणार ‘या’ उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी; पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला !

ट्रम्प यांनी इराणवर बॉम्बहल्ला करण्याची धमकीही दिली. ग्रीनलँडमध्ये बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटलंय. रशिया आणि आपण युक्रेनमधील रक्तपात थांबवण्यासाठी करार करू शकलो नाही आणि जर मला कळले की ती रशियाची चूक आहे, जी कदाचित ती नसेलही, पण जर मला कळले की ती रशियाची चूक आहे, तर मी रशियाकडून येणाऱ्या सर्व तेलावर दुय्यम कर लावले. त्यामुळे जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी केले तर तुम्ही अमेरिकेत व्यवसाय करू शकत नाही. सर्व तेलावर 25 ते 50 टक्के कर असेल, असे ट्रम्प म्हणाले. याचा थेट परिणाम भारत आणि चीनवर होणार आहे.

मोठी बातमी! बीड जिल्हा कारागृहात जोरदार राडा, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला मारहाण

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. त्याच्या तेल खरेदीवरही बंदी घालण्यात आली होती. परंतु भारत आणि चीन व्यतिरिक्त, इतर काही देशांनी रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. अमेरिकेने थेट खरेदीदारांवर दुय्यम शुल्क लादल्याने पुतिन यांचा तेल महसूल कमी होऊ शकतोच, परंतु त्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांनाही आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.


भारताने चीनला टाकले मागे

बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या यूबीएसचे विश्लेषक जियोव्हानी स्टॉनो यांनी द गार्डियनला सांगितले की, ट्रम्पने व्हेनेझुएलाच्या तेलाबाबत जसे केले तसेच ते खरेदीदारांना लक्ष्य करण्यासाठी रशियासोबतही असेच करू शकतात. या निर्णयाचा चीन आणि भारतावर परिणाम होऊ शकतो. तथापि, येत्या काळात काय घोषणा केली जाते ते आपल्याला पाहावे लागेल. चीनला मागे टाकून भारत समुद्रातून येणाऱ्या रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार बनला.


भारताकडून सर्वाधिक 35 कच्चे तेल आयात, अनेक देशांना बसणार फटका

2024 मध्ये भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 35 टक्के रशियन कच्च्या तेलाचा वाटा आहे. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासून भारत रशियन तेल खरेदी करत आहे. परंतु आता अमेरिकेच्या निर्णयाने चिंता वाढू शकते. भारत आणि चीन व्यतिरिक्त, तुर्की देखील रशियन तेलाचा मोठा खरेदीदार आहे. याशिवाय, बल्गेरिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्लोवाकिया आणि हंगेरी हे देशही रशियन तेल खरेदी करण्यात आघाडीवर आहेत. पाकिस्तानने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा करारही केला आहे.

follow us