डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने 12 लाख मुलांचं आयुष्य धोक्यात; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा..

Donald Trump New Decision : अमेरिकेने जगातील गरीब देशांत लसीकरण मोहिमेला समर्थन देणाऱ्या Gavi संस्थेला आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. द टाइम्सच्या रिपोर्टनुसार 281 पानांच्यडा स्प्रेडशीटमध्ये हजारो विदेशी सहायता कार्यक्रमांसाठी ट्रम्प प्रशासनाच्या योजनांना लिस्टेड करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा (Donald Trump) हा निर्णय जगालाच संकटात टाकणारा आहे. यामुळे गरीब देशांतील लसीकरण प्रभावित होणार आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून मागील 25 वर्षांत लाखो बालकांचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानुसार मलेरियाशी लढण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांत कपात होणार आहे. दुसरीकडे एचआयव्ही आणि टीबी यांसारख्या आजारांवरील उपचारांशी संबंधित काही अनुदान सुरुच ठेवण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) संस्थेने अलीकडेच काँग्रेसला एक रिपोर्ट सादर केला. यामध्ये विदेशी सहायता प्रोजेक्ट्सचा उल्लेख करण्यात आला आहे. यात कोणते प्रोजेक्ट्सचा निधी बंद करायचा आणि कोणत्या प्रोजेक्ट्सचा निधी सुरू ठेवायचा याबाबत माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत होणार बदल, द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा , डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
यातून स्पष्ट झाले आहे की अमेरिका जागतिक स्वास्थ्य आणि मानवीय सहायतेत आपली भूमिका मर्यादीत करत आहे. रिपोर्टनुसार प्रशासनाने 5 हजार 341 विदेशी सहायता प्रोजेक्ट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त 898 परियोजना सुरू ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाने Gavi संस्थेला मोठे नुकसान होणार आहे. कारण ही संघटना जगभरातील गरीब देशांत आवश्यक लसींचा पुरवठा करते.
संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की अमेरिकी मदत बंद झाली तर पुढील पाच वर्षांत तब्बल 75 मिलियन मुलांचे नियमित लसीकरण करता येणार नाही. यामुळे 1.2 मिलियन (12 लाख) मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो. Gavi संघटनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. सानिया निष्ठार यांनी सांगितले की हा निर्णय विकसनशील देश आणि जागतिक आरोग्यासाठी धोक्याचा ठरणार आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध
सीयरा लियोन देशाचे आरोग्यमंत्री डॉ. ऑस्टिन डेम्बी यांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली. या निर्णयामुळे लाखो मुलांच्या जीवाला धोका आहे. Gavi शिवाय आमचा देश एमपॉक्स सारख्या आजारांसाठी आवश्यक लसी उपलब्ध करू शकणार नाही. त्यामुळे अमेरिकी प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती डेम्बी यांनी केली.
ट्रम्प यांचा आणखी एक धक्का, या देशांतील 5 लाख लोक होणार हद्दपार; भारतीयांचं काय?
अमेरिकी प्रशासनाच्या या निर्णयामुळे Gavi संघटना मोठ्या संकटात सापडू शकते. अमेरिका या संघटनेच्या बजेटमध्ये 13 टक्के योगदान देत होता. कोरोना संकटाच्या काळात तर अमेरिकेने मोठी मदत केली होती. युरोपीय देश आणि जपान यांसारख्या श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्था मोठ्या दबावात आहेत. यामुळे त्यांच्याकडूनही आर्थिक मदतीत कपात केली जात आहे. त्यामुळे Gavi ला आपले अभियान सुरू ठेवण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागतील.