Download App

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना धक्का! अध्यक्षपदाची निवडणूकच लढता येणार नाही; कारण काय?

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) न्यायालयाने मोठ झटका दिला आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीत (US Presidential Election 2024) ट्रम्प गुंतलेले असतानाच ही बातमी येऊन धडकली. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. अमेरिकेत जानेवारी 2021 मध्ये कॅपिटल हिंसाचार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांना अपात्र ठरवले आहे. अमेरिकेतील न्यायालयानं ट्रम्प यांना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अपात्र ठरवलं आहे. ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपती पदासाठीच्या राज्याच्या प्राथमिक मतदान यादीतून काढून टाकण्यात आलं आहे. पुढील वर्षी अमेरिकेत अध्यक्षीय पदासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत आता डोनाल्ड ट्रम्प यांना सहभागी होता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

Donald Trump : अमेरिकेत हाय होल्टेज ड्रामा; माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, 20 मिनीट तुरुंगात

अमेरिकी संविधानातील तरतुदींनुसार अमेरिका सरकारच्या विरोधात कॅपिटल हिल हिंसा भडकावण्याच्या प्रकरणात ट्रम्प यांची भुमिका या कारणामुळे 2024 च्या निवडणुकीत अपात्र घोषित करण्यात येऊ शकते. या पदासाठी ट्रम्प यांचं नाव आघाडीवर होतं. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाची अंमलबजावणी 4 जानेवारीपर्यंत रोखली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची संधी राहणार आहे. मिनेसोटा आणि मिशिगन न्यायालयांनी मात्र ट्रम्प यांच्याविरोधातील अशाच प्रकारच्या याचिका फेटाळल्या आहेत. मात्र कोलोरॅडो सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांच्याविरोधात निकाल देत त्यांना अपात्र घोषित केले आहे.

या निर्णयावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयात त्रुटी आहेत. या निर्णयाविरोधात लवकरच अमेरिकी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहोत. कॅपिटल हिंसा प्रकरणात आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. ट्रम्प यांच्या टीमने स्पष्ट केले की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय फक्त कोलोरॅडोपुरताच लागू होतो मात्र ऐतिहासिक निर्णय 2024 च्या राष्ट्रपती अभियानावर सरकार करेल.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात? न्यायालयाकडून अटक करण्याचे आदेश

दरम्यान, ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले होते. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली होती. ट्रम्प सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज