Download App

अमेरिकेत आता Income Tax नाही! तिजोरी भरण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन रेडी..

Donald Trump : राष्ट्रपती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर निश्चित होणार आहे. देशातील इमकम टॅक्स (Income Tax) व्यवस्था संपुष्टात आण्ण्याबद्दल ट्रम्प यांनी अनेकदा भाष्य केले होते. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इनकम टॅक्स व्यवस्था समाप्त करून टॅरिफ वाढविण्याचा मुद्दा उपस्थित केला.

ट्रम्प यांनी 27 जानेवारी रोजी फ्लोरिडातील डोरल येथे आयोजित 2025 रिपब्लिकन इशुज कॉन्फरन्समध्ये आयकर व्यवस्था समाप्त करण्याचा प्रस्ताव ठेवला जेणेकरून अमेरिकी नागरिकांचे डीस्पोजेबल उत्पन्न वाढवता येईल. टॅक्स आणि अन्य सोशल सिक्युरिटी टॅक्स दिल्यानंतर जे इनकम शिल्लक राहते त्याला डीस्पोजेबल इनकम म्हणतात.

ज्या व्यवस्थेमुळे अमेरिका आज जगात सर्वात श्रीमंत देश गणला जातो ती व्यवस्था या संभाव्य निर्णयाने पुन्हा आणता येईल असा दावा ट्रम्प यांनी केला. आता वेळ आली आहे की देशाने त्याच जुन्या व्यवस्थेचा पुन्हा स्वीकार करावा. परदेशांना समृद्ध करण्यासाठी आपल्या नागरिकांकडून कर घेण्याऐवजी आपल्या नागरिकांना समृद्ध करण्यासाठी विदेशांवर टॅक्स लावला पाहिजे असे मत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केले.

युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनला मिळणारी मदत अमेरिका रोखणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

ट्रम्प पुढे म्हणाले अमेरिका लवकरच आणखी श्रीमंत होणार आहे. 1913 आधी अमेरिकेत कोणताही इनकम टॅक्स नव्हता. तरी देखील टॅरिफ प्रणालीने देशाला समृद्ध बनवले होते. 1870 ते 1913 या दरम्यान टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेने सुवर्णकाळ पाहिला. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सन 1887 च्या महान टॅरीफ आयोगाचा उल्लेख केला. त्यावेळी अमेरिका इतका श्रीमंत होता की पैशांचा विनिमय कसा करायचा हे निश्चित करण्यासाठी आयोग स्थापन करावा लागला होता.

टॅरिफ म्हणजे काय?

कोणत्याही देशाचे सरकार आयात आणि निर्यातीवर शुल्क आकारते त्याला टॅरीफ असे म्हटले जाते. वस्तूंच्या आयातीवर आकारल्या जाणाऱ्या ड्युटीला सुद्धा टॅरीफ म्हणून संबोधले जाते. याचे दोन फायदे सरकारला मिळतात. पहिला म्हणजे यातून सरकारला महसूल मिळतो आणि दुसरा फायदा म्हणजे देशात तयार होणाऱ्या वस्तूंची किंमत आयात होणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत कमी राहते. याचा फायदा देशांतर्गत निर्मात्यांना होतो. आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा टॅरिफ आणण्याच्या विचारात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका! वादग्रस्त नागरिकता आदेशावर न्यायालयाकडून स्थगिती

वादग्रस्त नागरिकता आदेश स्थगित

अमेरिकेच्या संविधानातील 14 व्या संशोधनानुसार अमेरिकेच्या जमिनीवर जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना नागरिकतेची हमी मिळते. इतकेच नाही तर दुसऱ्या देशांतून येथे स्थायिक झालेल्या लोकांच्या मुलांनाही नागरिकतेचा अधिकार मिळतो. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे देशात जन्माला येणाऱ्या मुलांच्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशाला स्थगिती दिली.

follow us