Download App

हल्ले बंद करा नाहीतर…., युद्धबंदी उल्लंघनावर डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला इशारा

Donald Trump On Israel Iran Ceasefire :  गेल्या 12 दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

  • Written By: Last Updated:

Donald Trump On Israel Iran Ceasefire :  गेल्या 12 दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु असून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे मात्र या घोषणेनंतर देखील दोन्ही देशांकडून हवाई हल्ले सुरु असल्याने पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलला (Israel Iran Ceasefire) धमकी देत इराणवर हवाई हल्ले बंद करण्याचे आदेश दिले आहे.

ट्रम्प इस्रायलवर संतापले  

सोशल मीडियावर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराण आणि इस्त्रायल युद्धबंदीचे उल्लंघन करत आहेत पण आम्हाला हे युद्ध ओढायचे नाही. युद्धबंदी दरम्यान हल्ला करणे योग्य नाही. इस्त्रायलने ताबतोड वैमानिकांना परत बोलावे. असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवारी शत्रुत्व संपवण्याच्या अंतिम मुदतीनंतरही इस्रायल आणि इराणने हल्ले करून युद्धबंदीच्या अटींचे उल्लंघन केले आहे. त्यांनी इस्रायलला त्यांचे वैमानिक परत बोलावण्याचा इशारा दिला, कारण ते इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

कधी हॉटेलमध्ये तर कधी घरी…, डॉक्टर महिलेचे गंभीर आरोप, खासदार आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवारी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये हे म्हटले आहे. हेगमधील नाटो शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी बोलताना ट्रम्प यांनी सततच्या हल्ल्यांबद्दल निराशा व्यक्त केली. “त्यांनी त्याचे उल्लंघन केले, पण इस्रायलनेही केले. मी इस्रायलवर खूश नाही,” असं ट्रम्प म्हणाले.

follow us