कधी हॉटेलमध्ये तर कधी घरी…, डॉक्टर महिलेचे गंभीर आरोप, खासदार आझाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

MP Chandrashekhar Azad : नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद पुन्हा एकदा देशातील राजकारणात चर्चेत आले आहे. खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगात (National Commission for Women) लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीएचडी स्कॉलर डॉ. रोहिणी घावरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खासदार आझाद (MP Chandrashekhar Azad) यांच्याविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाने दिली आहे.
माहितीनुसार, 2019 मध्ये उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेली असता अभ्यासादरम्यान,रोहिणी आणि चंद्रशेखर आझाद एकमेकांच्या संपर्कात आले आणि तीन वर्षे रिलेनशनशिपमध्ये होते. तर आता चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. ‘कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. सत्य बाहेर येईल. मी स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन. मी मागे हटणार नाही.’ असं डॉ. रोहिणी घावरी यांनी म्हटले आहे.
डॉ. रोहिणी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चंद्रशेखर आझाद आणि माझ्यात संभाषण सुरु होते. या दरम्यान चंद्रशेखर आझाद यांनी मला आश्वासन देत म्हटले होते की, मी अविवाहित असून माझ्यासारखी जीवनसाथी शोधत आहे. तसेच आझाद यांनी लग्नाचे आश्वसन देऊन माझ्याशी भावनिक संबंध निर्माण केले. या आश्वासनानंतर मी त्यांना वैयक्तिकरित्या स्वीकारले आणि त्यांच्या राजकीय प्रचारात त्यांना सक्रिय पाठिंबा दिला.
‘माझ्या पद्धतीने बँकेत यावं लागेल’; भाजप आमदार कुचेंची बँक मॅनेजरला शिवीगाळ
चंद्रशेखर यांनी माझ्या भारत दौऱ्यात, विशेषतः दिल्लीत, मला एका हॉटेलमध्ये आणि द्वारका येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावले आणि लवकरच माझ्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन माझ्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यांनी नेहमीच मला फसवले आणि सुरुवातीपासूनच, ते अविवाहित असल्याचे सांगून, लग्नाची खोटी आशा देऊन माझ्याशी अनेक वेळा माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.’ असं डॉ. रोहिणी यांनी या तक्रारीत म्हटले आहे. याच बरोबर रोहिणी यांनी एक्स वर देखील पोस्ट करत खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर वैयक्तिक आरोप केले आहेत.