Download App

ठरलं! डोनाल्ड ट्रम्पच देणार जो बायडेनला टक्कर, तिसऱ्यांदा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

Donald Trump: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी (US presidential Election 2024) होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे.

  • Written By: Last Updated:

Donald Trump: संपूर्ण जगाचे लक्ष सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी (US presidential Election 2024) होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे. आज या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे.

ट्रम्प यांना रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये पुरेशी प्रतिनिधी मते मिळाल्याने पक्षाकडून आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी 2016 आणि 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. 2016 मध्ये ते जिंकले होते तर 2020 मध्ये जो बायडेन यांनी त्यांचा पराभव झाला होता. तर 2024 मध्ये पुन्हा एकदा ट्रम्प यांचा सामना जो बायडेन (Joe Biden) यांच्याशी होणार आहे. त्यामुळे यावेळी ट्रम्प यांचा विजय होणार का? याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर ट्रम्प यांनी सोमवारी ओहायोचे सिनेटर जेडी व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केला आहे.

जेडी व्हॅन्स एकेकाळी ट्रम्प यांचे विरोधक होते मात्र आता एकत्र काम करताना दिसत आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ नेटवर्कवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, विचारविनिमय केल्यानंतर आम्ही ठरवले आहे की, अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार ग्रेट स्टेट ऑफ द ग्रेट स्टेटचे सिनेटर जे.डी. व्हॅन्स असणार आहे. व्हॅन्स 2022 मध्ये निवडणून आले होते.

तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावर भाष्य करत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यानंतर माझा मुत्यू निश्चित झाला होता मात्र नशिबाने मी वाचलो.

या प्रकरणात एफबीआयने प्रतिक्रिया देत म्हटले आहे आहे की, पेनसिल्व्हेनियामधील निवडणूक रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळी झाडणाऱ्या तरुणाने ही घटना एकट्याने घडवून आणली.

विश्वजीत कदमांनी क्रॉस व्होटिंग केलं? ठाकरेंच्या आमदाराचा संशय; थोरातांनीही रोखठोक फटकारलं!

एफबीआय या घटनेची सखोल चौकशी करत आहे. ट्रम्पवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स (20) आहे. अजून या प्रकरणाचा खूप तपास बाकी आहे. अशी माहिती एफबीआयने माध्यमांना दिली आहे.

follow us