Download App

रशियातील कामचटकामध्ये पुन्हा भूकंप! 7.8 रिश्टर स्केलच्या धक्क्यांनंतर त्सुनामीचाही इशारा

Earthquake in Russia Kamchatka मध्ये पुन्हा भूकंप झाला आहे. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल होती. त्यानंतर त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

Earthquake in Russia Kamchatka warned for tsunami after 7.8 Richter scale tremors : रशियातील कामचटकामध्ये पुन्हा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल एवढी होती. यामध्ये आद्याप कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पण त्यानंतर त्सुनामीचाही इशारा देखील देण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिक भयभीत झालेले आहेत.

वारंवार 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या पुढेचे धक्के

दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये याठिकाणी वारंवार 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या पुढेच भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या अगोदर 13 सप्टेंबरला देखील अशाचप्रकारे कामचटकामध्ये भूकंपाच्या धक्क्यांने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र या ठिकाणहून अद्याप कोणताही जिवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

जो मनोज जरांगेंना समर्थन देईल त्याला पाडा; नागपुरातून भूजबळांचा थेट आदेश

या पार्श्वभूमीवर रशियन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच सुरक्षित स्थळ हलण्याचा इशारा दिला आहे. कारण यानंतर रशियाच्या या भागामध्ये त्सुनामी येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे वारंवार होत असलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

कुणाला धनलाभ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 19 सप्टेंबरचं राशीभविष्य?

follow us