जो मनोज जरांगेंना समर्थन देईल त्याला पाडा; नागपुरातून भूजबळांचा थेट आदेश
Chhagan Bhujbal नागपूरमध्ये समता परिषद मेळाव्यामध्ये बोलत होते. तेव्हा त्यांनी ओबीसीला आदेश दिले की, जे जरांगेंना समर्थन देतील त्यांना पाडा.

Chhagan Bhujbal Order for Defeat politicle leader in election who support Manoj Jarange : राज्यामध्ये सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामध्ये राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी समाजाला थेट आदेश दिले आहेत की, जे राजकीय नेते मनोज जरांगे यांना समर्थन देतील त्यांना निवडणुकीमध्ये पाडा.ते नागपूरमध्ये समता परिषद मेळाव्यामध्ये बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
काल गुरूवारी 18 सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांसह मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी राज्यातील ओबीसी समाजाला थेट आदेश दिले आहेत की, जे राजकीय नेते मनोज जरांगे यांना समर्थन देतील त्यांना निवडणुकीमध्ये पाडा. भुजबळ म्हणाले की, जरांगेंच्या आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांवर जी दगडफेक झाली होती. त्याच्या नियोजनामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदाराचा सहभाग होता. असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, जो मनोज जरांगे यांना समर्थन करेल त्यांना निवडणुकीमध्ये पाडा.कारण मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे.
कुणाला धनलाभ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 19 सप्टेंबरचं राशीभविष्य?
तसेच भुजबळ यांनी यावेळी सवाल केला की, आम्ही आमचा आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? शरद पवार यांचा आदर करतो पण त्यांना माझे सांगणे आहे की, शिवसेना सोडून तुमच्यासोबत आलो ते मंडल कमिशनासाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केले त्यासाठी तुमचे आभार देखील मानले पण आमच्या आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको का? मंडल आयोग येईपर्यंत सरकार आपल्या पद्धतीने आरक्षण देत होते.
आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?
असा सवाल मंत्री भुजबळ यांनी शरद पवार यांना विचारला आहे. ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का? पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हापासून मराठी समिती अस्तित्वात होती, त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार आणि जयंत पाटील होते. शिवसेनेच्या वतीने शिंदे आणि सुभाष होते आणि काँग्रेसच्या वतीने थोरात आणि अशोक चव्हान होते त्यावेळी आपण बोलला नाहीत.