अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकामागे एक अशा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय. तुर्की, सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे (Earthquake)धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसलाय. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे (Climate change)बचावकार्यात अडथळे येताहेत.
या शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपानं तुर्की आणि सीरिया हादरलंय. सोमवारी सकाळी झालेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात दोन्ही देशांमध्ये 3 हजार 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 15000 हून अधिक लोक जखमी झालेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
तुर्की येथे 7.8, 7.6 आणि 6.0 तीव्रतेचे सलग तीन मोठे भूकंप झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, पहिला 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप सोमवारी पहाटे 4:17 वाजता तुर्कीमधील गॅझियानटेप शहराजवळ झाला. याचा केंद्रबिंदू सुमारे 17.9 किलोमीटर खोल होता. भूकंपाचा दुसरा धक्का तुर्कीची राजधानी अंकारा आणि इराकी कुर्दिस्तान शहर एर्बिलपर्यंत जाणवला. मोठ्या भूकंपानंतर तुर्की येथे 40 हून अधिक भूकंपाचे बसले.
तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगान यांनी 7.8 तीव्रतेच्या भूकंपाचे वर्णन 1939 नंतर देशातील सर्वात मोठी आपत्ती म्हणून केलं आहे. त्यांनी सांगितलं की, 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर, 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.